Deepak kesarkar Saam Tv
महाराष्ट्र

Deepak Kesarkar: "मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाईन, माझी केंद्रात ओळख..." दीपक केसरकरांचे सूचक विधान

Deepak Kesarkar Statement: 'मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नाही' असे म्हणणाऱ्या दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाबाबत केलेल्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Saam Tv

Deepak Kesarkar: फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात संधी न दिल्याने अनेक नेते नाराज असल्याचे पाहायला मिळते. अशात 'मंत्रिपद न दिल्याने मी नाराज नाही', असे म्हणणाऱ्या दीपक केसरकर यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. "मी साईबाबांचा भक्त आहे. ते माझं मंत्रिपद ठरवत असतात. मी मंंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाईन. माझे केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत" असे केसरकर यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे.

माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाबाबत सूचक विधान केले. त्यांनी "मला मंत्रिपद मिळू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो. मी साईबाबांचा भक्त आहे. मी मंत्रिपदापेक्षाही मोठ्या पदावर जाईन. माझे केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. माझी तेथे चांगली ओळख आहे", असे म्हटले आहे.

गणवेश योजनेवरुन आदित्य ठाकरेंनी केसरकरांवर आरोप केला होता. माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणावरही भाष्य केले. "आदित्य ठाकरेंचं वय आहे, तितकीही त्यांना अक्कल नाही. ते अजून लहान आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून यांना करोडो रुपये मिळतात, त्याला हे लोक खोके म्हणतात. थोडे पैसे मिळाले की त्याला ते मलाई बोलण्याची त्यांना सवय आहे. त्यांच्यामुळेच शिवसेनेचे दोन तुकडे झाले", असे विधान दीपक केसरकरांनी केले आहे.

"मी अडीच वर्ष मुंबईचा पालकमंत्री होतो. या काळात एकही कंत्राटदार, बिल्डरने मला एक रुपया जरी दिला असं म्हटलं तर मी राजकारण सोडेन. आदित्य ठाकरेंसारख्या लहान मुलाकडून ऐकून घ्यायला मी आलेलो नाही. हम आग पे चलते है, चलते रहेंगे! ये लोग पॅलेस पॉलिटीक्स करते है, करते रहैंगे!" या शब्दांमध्ये केसरकरांनी भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरुन ठाकरेंवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT