deepak kesarkar, uddhav thackeray, political news
deepak kesarkar, uddhav thackeray, political news saam tv
महाराष्ट्र

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : तुमच्याबद्दल आदर आहे, आता बाेललात तर... दिपक केसरकरांनी दिला उद्धव ठाकरेंना इशारा

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Deepak Kesarkar News : जोडे पुसून घेणं हे सरंजाम शाहीच लक्षण आहे. पॅलेस पॉलिटिक्स या पुढे महाराष्ट्रात चालणार नाही. हे त्यांनी नीट लक्षात घ्यावे असा सल्ला शिक्षणमंत्री दिपक केसरकर (deepak kesarkar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना दिला आहे. दरम्यान तुमच्याबद्दल आदर असून जनतेला भडकविण्याचे काम बंद करावे असेही मंत्री केसरकर यांनी नमूद केले. (Maharashtra News)

ज्यांची जोडे पुसायची लायकी नाही ते सरकार चालवत आहेत अशी जहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभा-यांवर केली. त्यावर माध्यमांनी केसरकर यांना छेडले असता त्यांनी या पुढे महाराष्ट्रात पॅलेस पॉलिटिक्स चालणार नाही. हे त्यांनी लक्षात घ्यावे असे नमूद केले.

केसरकर म्हणाले तुम्ही पत्रकार परिषद घेतली तर मी त्याला वेळाेवेळी उत्तर देईन. तुम्ही लोकांना किती भडकवल, किती प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या जनतेला मलाही सांगावं लागेल असा गाैप्यस्फाेट केसरकर यांनी केला.

बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जाऊ नका

केसरकर पुढे म्हणाले आपल्या विरोधात गेलं की ते थांबवायचं आणि आंदोलन घडवून आणायची आणि मग त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची याच्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे कारण महाराष्ट्राचा विचार करणं हे बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला शिकवलं त्या विचारापासून लांब जाऊ नका अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय.

संजय राऊत चुकलेच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका दिवसात जेवढं काम करतात तेवढं काम संजय राऊत यांनी एक महिन्यात करून दाखवावे असे आव्हान मंत्री केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांना दिले आहे. केवळ ऑफिसमध्ये बसून काम होत नाहीत. संजय राऊत हे एक संपादक आहेत. ते बोलताना चुकले आहेत.

थोडं तरी कौतुक करा

एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल दिल्ली पर्यंत घेतली जाते त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांचे थोडं तरी कौतुक करा असा सल्ला शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी संजय राऊत यांना दिला. संजय राऊत यांनी विरोधी पक्ष कधी सुट्टीवर जात नाही असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले होते त्यावर बोलताना दिपक केसरकर यांनी राऊतांवर टीका केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO News: EPFOच्या नियमात बदल; लग्नकार्य आणि घर खरेदीसाठी EPF खात्यातून पैसे काढता येणार, कसा कराल अर्ज?

Today's Marathi News Live : भाजप आणि आरएसएसचा आरक्षण संपवणं हा अजेंडा - अरविंद केजरीवाल

Narendra Modi यांच्या सभेत गोंधळ घालणार शरद पवार गटाचा पदाधिकारी?

Nashik News: 'कांद्यावर बोला', PM मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण कोण? मोठी माहिती समोर

ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, प्लॅस्टर असूनही Cannes Film Festival 2024 साठी आराध्यासोबत रवाना

SCROLL FOR NEXT