Deepak Kesarkar News Saam tv
महाराष्ट्र

Deepak Kesarkar News: 'मनोज जरांगेंनी उपोषणातून कमावले, ते भाषणातून गमावू नये; दीपक केसरकर यांचा सल्ला

Deepak Kesarkar News: मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी सरकारने शब्द दिला असताना जरांगे यांच्याकडून सरकारवर टीका केली जात आहे. यावरून मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांनी सल्ला दिला आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे

Deepak kesarkar On Manoj Jarange:

आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यात मराठा आरक्षणासाठी दौरे सुरु केले आहेत. या दौऱ्यातील सभेत जरांगे यांच्याकडून सरकारवर टीका केली जात आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी सरकारने शब्द दिला असताना जरांगे यांच्याकडून सरकारवर टीका केली जात आहे. यावरून मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांनी सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)

दीपक केसरकरांनी जरांगे यांना काय सल्ला दिला?

'सरकारने शब्द दिल्यानंतर दौरे करणे कितपत योग्य? मनोज जरागेंनी उपोषणातून कमावले, ते भाषणातून गमावू नये, असा सल्ला दीपक केसरकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणावर भाष्य करताना मंत्री केसरकर म्हणाले, 'कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य टिकले पाहिजे. दोन्हीकडून हे तातडीने थांबलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला डोकं लावून मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा शब्द दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे'.

'आंदोलन जिवंत राहण्यासाठी काहीतरी करणे चुकीचे आहे. आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणत्याही समाजाने एकमेकांविरोधात वक्तव्य करू नये. सरकारची भूमिका ठाम आहे. कुणीही मनात संशय बाळगू नका. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, असं केसरकरांनी म्हटलं आहे.

'सर्व विभागातून मराठा समाजाचा इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरू आहे. डाटा गोळा करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे. रेकॉर्ड तयार झाल्यावरच कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, कोणत्याही परवानगीशिवाय लोअर परळ येथील डेलिसल ब्रिजचं उद्घाटन केल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यावर भाष्य करताना केसरकर म्हणाले, 'सुरक्षेचे नियम डावलून उद्घाटन होऊ शकत नाही. चार-पाच वर्षे रखडलेली कामे आता जलदगतीने होत आहे. शासकीय उद्घाटनाला सन्मानपूर्वक बोलावल्यावर त्यांनी यायला पाहिजे होतं'.

'तुमच्याकडे अधिकार होते, तेव्हा तुम्ही मंत्रालयात देखील येत नव्हते. तेव्हा लोकांना भेटत नव्हते. जो बुंदसे गयी, वो हौदसे नहीं आती. रखडलेला प्रकल्प आमच्या काळात होत आहे. याचे वाईट वाटून घेऊ नका. लोकांच्या सुरक्षेशी खेळाल तर केसेस होणारच, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: वॉशिंगटनच्या हॉटेलमध्ये गोळीबाराचा थरार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, थरकाप उडवणारा VIDEO

Maharashtra News Live Update: जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचे भावी आमदार आशयाचे लागले बॅनर

Raigad Top 10 Places: उन्हाळ्याच्या सुट्टीत रायगडजवळील ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट! ‘मिसिंग लिंक’मुळे वेळेची मोठी बचत|VIDEO

Sunday Horoscope: सुर्यदेवाच्या कृपेने वाटेतले अडथळे होतील दूर, ५ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ

SCROLL FOR NEXT