Maharashtra Corona Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

गेल्या 24 तासात राज्यात 122 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 31,111 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 72,42,921 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 29,092 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 68,29,992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. (Maharashtra Corona Update)

गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,41,832 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,67,334 रुग्ण अॅक्टीव आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.

ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती

गेल्या 24 तासात राज्यात 122 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 40, मीरा भाईंदर 29, नागपूर 26, औरंगाबाद 14, अमरावती 7, मुंबईत 3 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात 1860 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 959 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! २ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, पाहा घटनेचा थरारक VIDEO

Home Made Lip Balm: घरच्याघरी दोन मिनिटांत तयार करा लिपबाम, फाटलेले ओठ होतील एकदम सोफ्ट

Post Diwali Skin Care: दिवाळीनंतर वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेची घ्या अशा प्रकारे काळजी; फॉलो करा या टीप्स

Maharashtra News Live Updates: अजित पवार उद्या नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर

VIDEO : टिंगरेंनी शरद पवारांसह काँग्रेस, शिवसेनेला कोर्टात ओढलं

SCROLL FOR NEXT