गोंधळ आंदोलन
गोंधळ आंदोलन विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी मनसे आक्रमक; तहसील कार्यालयासमोर गोंधळ आंदोलन

विनोद जिरे

बीड - बीडच्या वडवणीमध्ये जिल्ह्यात ओला दुष्काळ Wet drought जाहीर करा, ही मागणी घेऊन मनसे MNS आक्रमक झाली आहे. वडवणी तहसील कार्यालयासमोर Wadwani Tehsil Office तब्बल दोन तास गोंधळ आंदोलन करण्यात आलं आहे. त्यावेळी तहसील कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली विमा कंपनी महसूल प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी काढणी हंगामात जोरदार पाऊस झाल्याने, वाहून गेले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जनावरे देखील वाहून गेले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने पंचनाम्याचे नाटक बंद करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. (Declare wet drought in Beed MNS aggressive for demand)

हे देखील पहा -

तसेच सर्व पिकांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी. जर येणाऱ्या आठ दिवसांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना मदत दिली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना सरसकट मदत करा- धनंजय मुंडे

कोल्हापूर सांगली Kolhapur Sangali मधील महापूरापेक्षा भयंकर परिस्थिती मराठवड्यात Marathwada निर्माण झाली असून या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलेलं नाही. त्यामुळे सध्या शेतीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी बीडचे पालकमंत्री तसेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Dhanajay Mundhe यांनी केली आहे.

मागणी केलं म्हणजे काही मोठ काम केलं नाही

कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी Raj Thackeray एका पत्राद्वारे शेतकऱ्यांना तातडीटी ५० हजार रुपये मदत करावी अशी मागणी केली होती तसेच पंचनामे होत राहतील पण आत्ता शेतकऱ्यांना मदत करणं महत्वाच आहे असं पत्र त्यांनी लिहलं होत. मात्र या पत्रावरती शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटींल GulabRao Patil यांनी राज ठाकरें वर निशाना साधला होता मदत करणं सोप्पं असत आणि मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही अस ते म्हणाले होते तसेच पंचनामे करुणच मदत करणार असल्याचही ते म्हणाले होते मात्र आता खुद्द धनंजय मुंढेनीच पंचनामे न करता मदत करण्याची मागणा केल्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: लोखंडाच्या कढईमध्ये चुकूनही बनवू नका हे पदार्थ, नाहीतर...

Pune Loksabha Election: 'धंगेकर पॅटर्न' की मतदारांचं 'मोहोळ'? वसंत तात्या कुणाचं गणित बिघडवणार?

IPL 2024 RR vs PBKS: राजस्थानच्या पराभवाचा चौकार! ५ विकेटने पंजाब किंग्सचा विजय

Slovakia PM: स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळीबार; प्रकृती गंभीर

Maharashtra Politics: टेम्पो भरभरून माल पाठवला जात असेल, तर देशातला काळा पैसा अजूनही तसाच; उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा

SCROLL FOR NEXT