नांदेड: मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने राज्य सरकारने मराठा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज प्रतिक्रिया दिलीये. कायदेशीर सल्ला घेऊनच मराठा आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ते म्हणाले (Decision to establish Maratha Commission taken after legal advice says Minister Ashok Chavan).
"कायदेशीर सल्ला घेऊनच मराठा आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मराठा आयोग आणि सवलतीच्या बाबतीत निर्णय घेतला आहे. याचा फायदा मराठा समाजाला नक्की होईल", असं अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.
तसेच, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "उपोषण तो त्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी राजेंना उपोषण मागे घेण्यासाठी संपर्क केला मात्र त्यांचा संपर्क झाला नाही".
एकदा आयोग नेमला असताना दुसरा आयोग स्थापन करु शकतो का? - संभाजीराजे
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे आमरण उपोषणाला बसले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच, त्यांनी राज्य सरकारच्या मराठा आयोग स्थापन करण्याच्या निर्णयावरही भाष्य केले. माझा कायदेशीर आभ्यास नाही, पण, एक आयोग असताना दुसरा आयोग करू शकता का?, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला. तसेच, नुसता खुश करायला हे नको, असंही ते म्हणाले.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.