Nagpur Crime News saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : आधी फेसबूकवर मैत्री केली, तरुणीचा विश्वास जिंकला, नंतर भेटालयला बोलवले अन्...

Nagpur News : आरोपी तरुणाने आधी फेसबूकवरून पीडीत तरुणीशी मैत्री केली. नंतर तिला लग्नाचं आमिष दाखवत तिचा विश्वास जिंकला.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : तरुणाने फेसबूकवर ओळख झालेल्या मैत्रिणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर हत्याचार केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर तरुणीने लग्नासाठी अग्रह धरल्यानतंर त्याने तिची बदनामी करण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुणाने आधी फेसबूकवरून पीडीत तरुणीशी मैत्री केली. नंतर तिला लग्नाचं आमिष दाखवत तिचा विश्वास जिंकला आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तरुणीने लग्नाची मागणी केली तेव्हा तो पलटला आणि त्याने लग्नास नकार दिला. तसेच सोशल मीडियावर तिची बदनामी देखील केली. या प्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने पीडित तरुणीसोबत फेसबूकवरून मैत्री वाढवली. चांगली मैत्री झाल्यानंतर तिला भेटायला बोलावले आमि तिचा विश्वास जिंकला. अनेक भेटी झाल्यानंतर तिला लग्नाचं आमिष देत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. मात्र पीडितेने आरोपीला लग्नाबाबात वारंवार विचारणा केली, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर देण्यास सुरुवात केली. (Latest Political News)

आरोपी तरुण एवढ्यावर थांबला नाही. त्याने सोशल मीडियावर पीडितेची बदनामी देखील केली. तुझे संबंध माझ्या व्यतिरिक्त इतरांशीही आहे असा आरोप करत त्याने तिची बदनामी केली. हे सर्व असह्य झाल्याने आणि आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : कंटेनर चालकाचा अचानक यु टर्न; मोटारसायकल धडकली, एकाचा जागीच मृत्यू

Rajinikanth Movie Ticket: रजनीकांतचा जब्बरा फॅन! Coolie च्या तिकिटासाठी बारापट पैसा खर्च केला, किंमत वाचून धक्का बसेल

Maharashtra Politics: नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Kishore Kadam : किशोर कदम यांचे गाजलेले सिनेमे आणि अविस्मरणीय भूमिका

गावाहून परतली अन् वसतीगृहात गळ्याला दोर लावला; आयुष्य संपवण्यापूर्वी वडिलांना फोन, कोल्हापूर हादरलं

SCROLL FOR NEXT