चायनीज मांजाने त्याचा पंख कापला; बदकाने पक्षी मित्राच्या हातावर सोडला प्राण ! SaamTvNews
महाराष्ट्र

चायनीज मांजाने त्याचा पंख कापला; बदकाने पक्षी मित्राच्या हातावर सोडला प्राण !

मांज्याने जखमी झालेला बदक आकाशातून जमिनीवर पडला व दोन तास तडफडत राहिला.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : पर्यावरण व मानवजातीसाठी अत्यंत घातक ठरलेल्या चायनीज मांजाने हिंगोलीत एका पांढऱ्याशुभ्र बदकाचा जीव घेतला (Death) आहे. हिंगोली (Hingoli) शहरातील मंगळवार बाजार भागात ही घटना घडली असून, मांज्याने जखमी झालेला बदक आकाशातून जमिनीवर पडला व दोन तास तडफडत राहिला.

हे देखील पहा :

दरम्यान, परिसरातील काही नागरिकांचे या तडफडणाऱ्या बदकाकडे लक्ष गेले व याची माहिती तातडीने पक्षीमित्र विजयराज पाटील व वन्यजीव संरक्षक श्रीधर कंदी यांना देण्यात आली. डॉक्टरांच्या (Doctor) मदतीने त्यांनी या बदकावर उपचार (Treatment) देखील केले.

मात्र, चायनीज मांज्याने (Chinese Manja) या बदकाचे डावे पंख पूर्णपणे कापले गेले होते. त्याच्या मानेवर देखील प्रचंड इजा झाली होती. त्यामुळे दोन तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या बदकाने अखेर प्राणी मित्राच्या हातावरच आपले प्राण सोडले. या घटनेने मांजावर बंदी असताना देखील त्याचा सर्रासपणे वापर होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांविरोधात कार्यवाही करण्याची मागणी प्राणिमित्र संजय नाकाडे यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Wednesday Horoscope : घरातले वातावरण शांत ठेवा, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT