नाशिकनंतर धुळ्यात घडला भीषण अपघात
लग्नाच्या वऱ्हाडीचा भीषण अपघाता झालाय
भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
महाराष्ट्रात शनिवार घातवार ठरला आहे. नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघातात ९ जणांच्या मृत्यूची घटना ताजी असताना धुळ्यातूनही घटना समोर आली आहे. धुळ्यातील लग्नाच्या वऱ्हाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ओ
धुळ्यात वाहन अनियंत्रित झाल्याने दुभाजकाला धडकून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात तीन जण दगावले आहेत. तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. धुळे-सुरत महामार्गावरील तामसवाडी फाटा येथे शनिवारी ही अपघाताची घटना घडली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
नाशिकमध्ये भीषण अपघातात ९ दगावले
नाशिकच्या दिंडोरीत शुक्रवारी रात्री विहिरीत कार कोसळून अपघाताची घटना घडली. या अपघातात लहान मुलांसह ९ जण जण दगावले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून बचाव कार्य करण्यात आलं. कार विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्यात ९ जण आढळले.
कारमध्ये असलेल्या ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. दिंडोरीत अपघातात मृत पावलेल्या लोकांची नावे समोर आली आहे.
दिंडोरी अपघातातील मृतांची नावे -
१) रेश्मा सुनील दरगुडे (२७)
२) आशा अनिल दरगुडे ( ३२)
३) खुशी अनिल दरगुडे (१४)
४) श्रेयस अनिल दरगुड ( ११)
५) राखी सुनील दरगुडे ( ११)
६) श्रावणी अनिल दरगुडे (११)
७) समृद्धी राजेंद्र दरगुडे ( ७)
८) माधुरी अनिल दरगुडे ( १३)
९) सुनील दत्तू दरगुडे (३२)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.