महाराष्ट्र

सरकारी योजनेसाठी जिवंत लोकांना मृत दाखवलं; 7 जणांच्या घरी नोटीस धडकली, कोणी केलं कांड?

Parbhani News: महाराष्ट्रातील परभणीमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी ७ जिवंत गावकऱ्यांना मृत घोषित केल्याचा धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे.

Bharat Jadhav

विशाल शिंदे, साम प्रतिनिधी

परभणीच्या पूर्णा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धानोरा मोत्या गावातील ग्रामपंचायतीनं गावातील काही लोकांचा मृत्यू प्रमाणपत्र देऊन त्यांच्या नावाने कर्ज घेतल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. जिवंत असलेल्या गावातील ७ व्यक्तींनाच मृत दाखवून शासनाच्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतला. हा भोंगळ कारभार दोन वर्षाआधी घडला होता. दोन वर्षानंतर जेव्हा कामगार कल्याणकारी मंडळाने या लाभ घेणाऱ्या ७ जणांना नोटीस पाठवली तेव्हा कांड समोर आला.

दरम्यान नोटीस आल्यानंतर हे सर्वजण आपण जीवंत असल्याचा पुरावा घेऊन चुडावा पोलीस ठाण्यात पोहोचले. गावातील रहिवाशी सुरेखा माणिक दरंगे म्हणाल्या, ग्रामपंचायतीनं मी मेले म्हणून सांगितलं. माझ्या नावे दोन लाख रुपये कर्ज घेतलं. आता आम्हाला नोटीस आलीय. पण कर्ज आम्ही घेतलं नाही. दरम्यान सरकारी कामगार अधिकारी यांनी सुरेखा मणिक दरंगे यांच्या इतर सहा जणांना आणि ग्रामसेवकांना नोटीस बजावली आहे.

या प्रकारामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. गावातील लक्ष्मण बाबूराव टाक यांनी सांगितलं की, ग्रामपंचायतनं माझी पत्नीला मृत असल्याचं मृत्यूपत्र दिलं आणि आमच्या परस्पर दोन लाख रुपायांचे कर्ज काढण्यात आलं. आता दोन वर्षानंतर आम्हाला कर्ज फेडण्याबाबतची नोटीस आली. पण आम्ही कर्ज घेतलं नाही, त्यामुळे आम्ही आता चुडावा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आलो आहोत.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कार्यालय परभणी अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना विविध योजने अंतर्गत विविध प्रकारचे आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे देण्यात येतात. त्याअनुषंगाने आर्थिक कल्याण योजनेअंतर्गत सात जणांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT