Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: 'माझ्या अटकेसाठी ४ वेळा प्रयत्न, 'मविआ' सरकारकडून अधिकाऱ्यांना सुपारी', देवेंद्र फडणवीस यांचे गंभीर आरोप

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. १० ऑगस्ट २०२४

महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव होता, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला होता. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. नागपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"परमबिर सिंग जे बोलले ते खरं आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. आम्ही त्याचा पर्दाफार्श करु शकलो. मी, प्रविण दरेकर, गिरीश महाजन अन्य काही नेते आहेत, यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी दिली होती. पण काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खोट्या केसेस टाकण्यास नकार दिला," असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसेच " परमबीरसिंह यांनी एकच घटना सांगितली मात्र माझ्या अटकेसाठी चार वेळा प्रयत्न झाले. पण यांना काही मिळालं नाही. यांचे व्हीडीओ पुरावे सीबीआयला दिले. आजंही आमच्याकडे अनेक व्हीडीओ पुरावे आमच्याकडे आहेत. " असाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

काय म्हणाले होते परमबीरसिंह?

महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, गिरीश महाजन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मला सिल्वर ओक तसेच मातोश्रीवर बोलावण्यात आले होते, मात्र मी खोटे गुन्हे दाखल करण्यास नकार दिला, असे परमबीरसिंह यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

Blood Test for Depression : ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? तंत्रज्ञानामुळे निदान होणार झटपट ? पाहा VIDEO

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्तीनंतर मिळणार १ कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT