Beed Crime News Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Crime News: बीडमध्ये चाललंय काय? दिवसाढवळ्या तरुणावर गोळीबार, नागरिक दहशतीत

Beed Ambajogai Crime News: संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच बीडमध्ये तरूणावर गोळीबाराचा प्रकार घडलाय. अंबाजोगाई शहरातील माऊली नगरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाली असून, सुदैवाने जीवितहानी नाही.

Bhagyashree Kamble

विनोद जिरे, साम टीव्ही

दिवंगत माजी नगरसेवक संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्य पेटून उठलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरण, नंतर व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटल्याची घटना आणि आता बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार घडला आहे. अंबाजोगाई शहरातील माऊली नगरमध्ये एका तरूणावर दिवसाढवळ्या गोळीबाराचा प्रयत्न झालाय. खिडकीतून गोळी झाडून आरोपी फरार झाला असून, या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

बीडच्या अंबाजोगाई शहरातील माऊली नगरमध्ये गोळीबाराची घटना घडलीय. नवनाथ कदम यांच्या मुलावर गणेश पंडीत चव्हाण या युवकाने गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले, तरी या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

माऊली नगरातील सिद्धेश्वर नवनाथ कदम याच्यावर रेणापूर तालुक्यातील गोविंद नगर परिसरातील गणेश पंडित चव्हाण या युवकाने गोळीबार केलाय. गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाला. गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही, परंतू या घटनेनंतर अंबाजोगाई परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश चव्हाण हा नवनाथ कदम यांच्या पत्नीला धमकी देत होता. नवनाथ कदम यांनी या प्रकरणी गणेश कदम विरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे संतापलेला गणेश १७ जानेवारीला नवनाथ यांच्या घरी आला. त्याने नवनाथ यांच्यासोबत वाद घातला आणि नवनाथ यांच्या मुलावर म्हणजेच सिद्धेश्वर याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने सिद्धेश्वर थोडक्यात बचावला.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले ,पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसेच आरोपी तरुणाला अवघ्या ६ तासात पकडलं. गोळीबार करणारा आरोपी गणेश चव्हाण हा घटनेनंतर रेणापुरकडे पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT