Washim Crime News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : गोंदियातील ऑनलाईन जुगार प्रकरणात दाऊद कनेक्शनमुळे खळबळ, आरोपीविरोधात लूकआऊट नोटीस जारी

Onlive jugar Gondia News : ॲानलाईन जुगार प्रकरणात फरार आरोपी सोंटू जैन याने ५८ कोटींची फसवणूक केली होती.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : भारतात सुरु असलेल्या ॲानलाईन जुगाराचा दाऊद टोळीशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोंदिया येथील फरार आरोपी सोंटू जैन याला दाऊद टोळीचा हस्तक नावेद मदत करत असल्याची उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गोंदिया येथील बुकी आणि ॲानलाईन जुगारातील आरोपी सोंटू जैन याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर विदर्भातील ॲानलाईन जुगाराचे जाळे उघड झाले आहे. दाऊदचा हस्तक नावेद ५ वर्षांपासून ॲानलाईन जुगाराची टोळी चालवतो. (Crime News)

नावेदने सॅाफ्टवेअर कंपनी स्थापन केली असून तो ॲानलाईन गेमिंग सॅाफ्टवेअरचा पुरवठा करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ॲानलाईन जुगार प्रकरणात फरार आरोपी सोंटू जैन याने ५८ कोटींची फसवणूक केली होती. या तपासातून दाऊद कनेक्शनाचे धागेदोरे सापडले आहेत.  (Latest Marathi News)

फरार आरोपी सोंटू नवरतन जैन याच्याकडे देश विदेशात १२ ठिकाणी ८०० कोटींची मालमत्ता आहे. सोंटूचे १४ बॅंक खाते, चार लॅाकर पोलिसांनी गोठवले आहेत. सोंटू विरुद्ध लूकआऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच आरोपी सोंटू दुबईला फरार झाल्याची माहिती मिळत आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी आता प्रयत्न सुरु केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT