Daund Bazar Committee Saam tv
महाराष्ट्र

Daund Bazar Committee: दौंड बाजार समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा; राष्‍ट्रवादीची सत्‍ता गेली

दौंड बाजार समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा; राष्‍ट्रवादीची सत्‍ता गेली

साम टिव्ही ब्युरो

प्रफुल्ल भंडारी

दौंड : १९५९ मध्ये स्थापन झालेल्या दौंड बाजार समितीवरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) वर्चस्व कमी होऊन पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. (Daund) दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी (BJP) भाजप समर्थक गणेश जगदाळे (लिंगाळी) व उपसभापतिपदी शरद कोळपे (दहिटणे) यांची निवड झाली. निवडीनंतर भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. (Maharashtra News)

एप्रिल २०२३ मध्ये १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा पॅनेलने ९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने ९ जागा जिंकल्या होत्या. दरम्यान मे महिन्यात व्यापारी मतदारसंघातील शेतकरी विकास पॅनेलमधून निवडून आलेले संचालक संपतराव निंबाळकर यांचे निधन झाले. त्यानंतर जनसेवा पॅनेलचे ९ व शेतकरी विकास पॅनेलचे ८ असे संख्याबळ झाले.

दौंड बाजार समिती सभागृहात (Bajar Samiti) आज दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. प्राधिकृत अध्यासी अधिकारी म्हणून सहायक निबंधक (सहकार) हर्षित तावरे यांच्या देखरेखीत ही निवडणूक झाली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश शितोळे यांनी काम पाहिले. सभापतिपदासाठी जनसेवा पॅनेलचे गणेश जगदाळे व शेतकरी विकास पॅनेलचे बाळासाहेब शिंदे यांनी अर्ज दाखल केले. गुप्त पध्दतीने झालेल्या मतदानात गणेश जगदाळे यांना ९ तर बाळासाहेब शिंदे यांना ८ मते पडली. तर उपसभापतिपदासाठी जनसेवा पॅनेलचे शरद कोळपे व शेतकरी विकास पॅनेलच्या वर्षा मोरे यांच्यात लढत झाली. शरद कोळपे यांना ९ तर वर्षा मोरे यांना ८ मते पडली. मतमोजणीनंतर हर्षित तावरे यांनी सभापतिपदावर गणेश जगदाळे व उपसभापतिपदी शरद कोळपे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar:महानगरपालिकेच्या द्वारावर झेन-जी आंदोलकांना रोखलं; सुरक्षारक्षकांसोबत तरुणांची धक्काबुक्की

Raj Thackeray : पुढच्या २-४ महिन्यात देशात काहीतरी मोठी घडामोड घडणार, राज ठाकरेंचा दावा, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update:२ ते ५ महिन्यात देशात मोठी गडबड होईल - राज ठाकरे

नव्या विहिरीसाठी सरकार देतंय ४ लाखांचं अनुदान, दुरुस्तीसाठी मिळतंय अर्थसहाय्य, कुठे कराल अर्ज?

Virtual Metro Smart Card : स्मार्टफोनच बनणार तुमचं मेट्रो कार्ड, खिशात कार्ड नसतानाही करा क्यूआर कोडद्वारे प्रवास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT