Beed: आधी मुलीची हत्या मग पत्नीचा गळा कापला; नंतर स्वत: गळफास घेतला Saam TV
महाराष्ट्र

Beed: आधी मुलीची हत्या मग पत्नीचा गळा कापला; नंतर स्वत: गळफास घेतला

पत्नी व दोन वर्षीय चिमुकल्या मुलीची हत्या करून, स्वतःहा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

विनोद जिरे

बीड: पत्नी व दोन वर्षीय चिमुकल्या मुलीची हत्या करून, स्वतःहा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना, बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आली आहे. गावात मोहा रोड परिसरात रात्री साडेनऊ ते 10 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. तर घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. गावातील अल्लाबकश शेख याने आपली पत्नी व 2 वर्षीय मुलची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार प्रथमदर्शनी दिसून आला आहे.

तर या घटनेला अंजाम देऊन त्याने स्वतःहा देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान अल्लाबकश याने असं का केलं? याचा तपास पोलीस करत असून तिन्ही मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर अहवाल आल्यानंतर नातेवाईकांनी तक्रार दिली तर, गुन्हा दाखल होईल. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या दुर्दैवी व क्रूर घटनेने सिरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

Dapoli : कड्यावर वसलेलं गणपतीचं सुंदर मंदिर, दृश्य पाहून व्हाल मंत्रमुग्ध!

SCROLL FOR NEXT