९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर Saam TV
महाराष्ट्र

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर

उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात झालेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

डॉ. माधव सावरगावे

लातूर : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) तारखा आज जाहीर झाल्या असून ते दिनांक - 22, 23 आणि 24 एप्रिल 2022 रोजी उदगीरमध्ये पार पडणार असल्याची माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील (Kautikrao Thale-Patil) यांनी दिली आहे. उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात झालेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

आजच 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे (Bharat Sasane) यांची घोषणा करण्यात आल्यानंतर संमेलनाच्या प्रत्यक्ष नियोजनाला सुरुवातही करण्यात आली आहे. 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोरोना सावटाखाली पार पडले. आता ती वेळ येऊ नये अशी प्रार्थना संयोजकानी केली आहे.

हे देखील पहा -

नव्या वर्षात ओमिक्रॉनचे (Omicron) सावट असल्यानं आणि सध्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने संमेलनाची दिशा काय ठरते हे पाहावे लागेल. मराठवाड्यातील मिनी विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र उदयागिरी महाविद्यालयात हे संमेलन होणार आहे. साहित्य महामंडळ आणि संयोजकांच्या पहिल्याच बैठकीत संमेलनाध्यक्ष आणि संमेलनाच्या तारखा जाहीर करून नियोजित तारखांना संमेलन घेण्यासाठीची तयारीही सुरू करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT