Gautami Patil Chandra Dance
Gautami Patil Chandra Dance Saam TV
महाराष्ट्र

Gautami Patil Dance: चंद्रा गाण्यावर बेभान होऊन नाचली गौतमी; भन्नाट डान्सचा VIDEO व्हायरल

Satish Daud-Patil

Gautami Patil Dance Video : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. आपल्या हटके डान्सच्या शैलीनं गौतमीने महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घातली आहे. जिथे पाहा तिथे गौतमीच्या डान्सचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. गौतमीच्या कार्यक्रमाला नागरिकही तुफान गर्दी करत आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.  (Latest Marathi News)

या व्हिडीओत गौतमी पाटीलने चंद्रा या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. गौतमीला चंद्रा गाण्यावर थिरकताना पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ गौतमीच्या डान्स कार्यक्रमातील आहे. गौतमीने आपल्या इन्स्टाग्रावरून तो शेअर केला आहे.

आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी पसंती दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करते, असा आरोप अनेकांनी तिच्यावर केला होता. गौतमीच्या अश्लील डान्सची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरलही झाली होती.

कोण आहे गौतमी पाटील?

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील ही लावणी डान्सर आहे. ती मूळ धुळे जिल्ह्यातील असून तिचा जन्म सिंधखेडा या गावात झाला. गौतमी तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे.

गौतमीच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवी शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली. त्यानंतर तिने नृत्याचं शिक्षण घेतलं. सुरूवातील तिने छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सहकलाकार म्हणून काम केलं. मात्र, त्यानंतर तिच्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताच तिला मोठी प्रसिद्धी मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात धंगेकरानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

Amla Benefits: मधुमेहींसाठी आवळा ठरेल रामबाण उपाय; फायदे एकदा वाचा

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

Amravati: गढूळ पाण्यावरुन वडनेर गंगाई ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर राेष, उपविभागीय अभियंत्यांना दिला इशारा

Uddhav Thackeray : भाजप आरएसएसवर बंदी आणेल; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर बाण

SCROLL FOR NEXT