वसई/विरार : दहिसर पश्चिम मधील एसबीआय बँकमध्ये झालेल्या गोळीबारात विरार मध्ये राहणाऱ्या ऑफिस बॉय संदेश गोमाणे याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. बुधवारी सुमारे 3.30 च्या सुमारास दहिसर (Dahisar) पश्चिम मधिल एसबीआय बँक (State Bank Of India) मध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकला आणि यावेळी त्यांच्याकडून गोळीबार देखील करण्यात आला होता. दरोड्यादरम्यान दरोडेखोरांनी दोन राउंड फायर केले होते.
हे देखील पहा :
संदेश हा टाळेबंदी नंतर एसबीआय (SBI) मध्ये कामाला लागला होता. सात महिने तो बँकमध्ये (Bank) ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. मात्र, या घटनेत वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्याला जग सोडावे लागले आहे. संदेश हा एका गरीब घराण्यातला मुलगा असून शिक्षण घेऊन बँकिंग क्षेत्रात त्याला करियर करायचे होते. मात्र संदेशचे हे स्वप्न अधुरे राहिले आहे. मित्रांसोबत अगदी प्रेमळ वागणारा, निर्व्यसनी, सर्वांच्या मदतीला धावणारा अशी संदेशची ओळख होती. संदेशच्या मृत्यूने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्याचे आई वडील शेतकरी असून त्याला दोन मोठे विवाहित भाऊ आहेत. तसेच फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याचे लग्न होणार होते. दरोड्यावेळी (Robbery) इतक्या मोठ्या बँक मध्ये कोणतेही सुरक्षा रक्षक नव्हते अशी माहिती समोर आलीय. असाच प्रकार विरार मध्ये ऍक्सिस बँक दरोड्यामध्ये झाला होता. सुरक्षा कर्मचारी नसल्या मुळे एका महिलेला जीव गमवावा लागला होता. त्याचीच प्रचिती दहिसर मधल्या गोळीबार (Firing) प्रकरणामध्ये आली आहे. पोलिसांनी या गोळीबार प्रकरणात 2 आरोपींना अटक केली आहे. विकास यादव आणि धर्मेंद्र यादव हे दोन भाऊ या प्रकरणातील आरोपी असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.