Nandurbar Latest News दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar: १९८८ पासूनची परंपरा; सावरट गावात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Nandurbar Latest News: एकता मित्र मंडळाच्या पथकाने चार थर रचून दहीहंडी फोडून जल्लोष करण्यात आला.

दिनू गावित

नंदुरबार: नवापूर तालुक्यातील सावरट गावात १९८८ सालापासून दहीहंडी उत्सव (Dahi Handi) मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. कोरोनाची गेली दोन वर्षे वगळता खंड न पडता यंदा सावरट गावातील एकता मित्र मंडळाने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.‌ (Nandurbar Latest News)

हे देखील पाहा -

दहीहंडी उत्सवाची विशेषता म्हणजे सर्व बांधव शेतकरी असल्याने दिवसभर शेतात काम केल्यानंतर संध्याकाळी रात्री जवळपासच्या दहा गावातील नागरिकांनी एकत्र येत उत्सव साजरा केला. प्रथम श्रीकृष्ण भगवान यांच्या प्रतिमेची पारंपारिक विधिवत पूजा करून तरुण तरुणी द्वारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध करण्यात आले. एकता मित्र मंडळाच्या पथकाने चार थर रचून दहीहंडी फोडून जल्लोष करण्यात आला. एकूणच मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहराप्रमाणे सावरट (Nandurbar) गावात कलेचे सादरीकरण करत मोठ्या उत्साहात चौतीसावा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी अध्यक्ष कृष्णा गावित, सरपंच विकास वसावे, माजी सरपंच प्रेमलाल वसावे, गावाचे पोलीस पाटील सहादू दिनेश, राजू गावित, बितेश महाराज, उपसरपंच जनत देवजी, सुषमा मॅडम, कापडणीस मॅडम, कारभारी वसंत सामा, सेगा वळवी, गुलाबसिंग वसावे, स्वप्निल शेठ चिंचपाडा, किशन वसावे, दुर्गा गावित, अनिता गावित व आजूबाजूच्या दहा गावातील महिला पुरुष तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतताना अनर्थ घडला; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

अमित शाहांची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा! 1500 कोटींचे पॅकेज; टॅक्सीचालकांसाठी ही घेतला निर्णय

संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरू? सरकार कोणते विधेयक मांडणार?

Maharashtra News Live Update: पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात एनडीआरएफ टीम दाखल

विलिनिकरणाची चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! चार दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT