Beed Saam
महाराष्ट्र

Beed News: खिंडकर कराडपेक्षा मोठा गुंड, त्याचाही आका राष्ट्रवादी अजित पवार गटात; ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Dada Khindkar Beed Gangster Politics: दादा खिंडकर वाल्मिक कराड याच्यापेक्षा मोठा गुंड आहे. गावात त्याची मोठी दहशत आहे. ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा.

Bhagyashree Kamble

दादा खिंडकर वाल्मिक कराड याच्यापेक्षा मोठा गुंड आहे. गावात त्याची मोठी दहशत आहे. दादा खिंडकर टोळी चालवतो. जीवे मारण्याची धमकी देतो, असा खळबळजनक दावा ठाकरे गटातील बीडचे जिल्हाप्रमुख परमेश्र्वर सातपुते यांनी केला आहे. तसेच खिंडकर याचा आका राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील नेते आहेत, असाही खुलासा सातपूते यांनी केला आहे.

तरूणाला मारहाण प्रकरणी दादा खिंडकर पोलिसांसमोर शरण गेला आहे. पोलिसांनी दादा खिंडकरला ताब्यात घेतलं आहे. तेव्हापासून दादा खिंडकर कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. दादा खिंडकरच्या नावावर २० ते २२ गुन्हे दाखल आहेत. राजकीय नेत्यांचा वापर करून तो इतरांना अडकवायचा तसेच, त्यांच्या नावावर खोटे गुन्हे दाखल करायचा, असा दावाही सातपूते यांनी केला आहे.

'दादा खिंडकरला राजकीय वरदहस्त आहे. खिंडकरचा आका राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील नेते अमरसिंह पंडित आहेत. त्यांच्यामुळे खिंडकरवर चार गुन्हे दाखल झाले नाहीत, असा मोठा खुलासाही सातपूते यांनी केला आहे. अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांनी सपोर्ट केलं नसतं तर, दादा खिंडकर जेलमध्ये असता. दादा खिंडकरला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला नेत्यांनी कॉल केले आहेत', असंही सातपूते म्हणालेत.

'गावात मतदान होत असतानाही खिंडकर आणि त्याच्या टोळक्याची गुंडगिरी चालते. खिंडकर स्वतः मतदान करतात आणि जनतेच्या फक्त बोटाला शाई लावतात. तीन गावात खिंडकर आणि त्याच्या टोळक्याची मोठी दहशत आहे. या दहशतीखाली गावातील नागरिक राहत आहेत', अशी माहिती सातपूते यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT