DA Hike Saam Tv
महाराष्ट्र

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारने महागाई भत्त्यात केली मोठी वाढ

Maharashtra Government Employees DA Hike: महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Siddhi Hande

राज्य सरकारचा मोठा निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

३ टक्क्यांनी केली वाढ

राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे.वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत याबाबत विधायक निवेदन सादर केले. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महागाई भत्त्यात वाढ (DA Hike Announcement by Maharashtra Government)

राज्य शासनाने यावेळी महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे महागाई भत्ता हा ५५ टक्क्यांवरुन ५८ टक्के झाला आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. याचा फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

हा वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०२५ पासून लागू केला जाणार आहे. जुलै ते ऑक्टोबर २०२५ च्या कालावधीतील थकबाकी मार्च २०२६ मध्ये देण्यात येणार आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार चांगलाच वाढणार आहे.

सरकारने याबाबत सांगताना म्हटले की, सुधारित वेतनरचननेनुसार मूळ वेतनावर ५८ टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.याची अंबलबजावणी १ फेब्रुवारी २०२६ पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्याच्या पगारात महागाई भत्ता येऊ शकतो.

जुलै ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी मार्च २०२६ मध्ये देण्यात येणार आहे. यानंतरच्या कालावधीसाठीचे आदेश नंतर काढण्यात येणार आहे.थकीत महागाई भत्ता हा टप्प्याटप्प्याने मिळणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.

महाराष्ट्रातील तब्बल ५.१६ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि ८.७२ लाख पेन्शनधारकांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. शासकीय कर्मचारी, अनुदानित संस्था, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT