Maharashtra weather saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : मुरासू चक्रीवादळ किनारपट्टीला धडकलं; महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Maharashtra weather today : मुरासू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील हवामानात बदल झाला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

IMD yellow alert Maharashtra, Cyclone Murasu latest update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मुरासू’ या अत्यंत तीव्र चक्रीवादळाने अखेर किनारपट्टीवर जोरदार धडक दिली आहे. मध्यरात्री १ वाजताच्या आसपास ‘मुरासू’ चक्रीवादळानेदक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला (Cyclone Murasu impact on Maharashtra weather) तडाखा दिला. ताशी ५० ते ६० किलोमीटरच्या वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पावसामुळे आंध्रच्या किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विध्वंस झाला आहे. (Maharashtra rain forecast today)

या चक्रीवादळाच्या तीव्र प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानातही अचानक मोठा बदल झाला आहे. मुरासूमुळे राज्यात वादळी पावसासाठी (District wise rain alert Maharashtra) अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आज अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असणार आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. (IMD yellow alert for eight Maharashtra districts)

राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ (Maharashtra rain forecast for Konkan Marathwada and Vidarbha)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला.

इथेही विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर अनेक भागांत ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील.

शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

चक्रीवादळामुळे ओढवलेले हे अवेळी पावसाचे संकट पाहता हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. काढणीस आलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत, पावसादरम्यान विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्यावर, शेतात किंवा झाडांखाली थांबणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : श्वास घेताना छातीत वेदना होत असल्याने शरद पवार यांच्यावर उपचार सुरू

पार्थ पवारांविरोधात राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा स्फोट? सुनेत्रा पवारांसमोरच आमदारांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Tuesday Horoscope: आनंदात दिवस जाईल! 5 राशींच्या व्यक्तींच्या पैशाच्या समस्या होतील कमी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT