इंधन दरवाढ विरोधात विरोधात काँग्रेस ची सायकल रॅली अरुण जोशी
महाराष्ट्र

इंधन दरवाढ विरोधात विरोधात काँग्रेस ची सायकल रॅली

महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसह सायकल चालवत पोहचल्या विभागीय आयुक्त कार्यालयावर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती : केंद्रातील मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी व अत्याचारी, शेतकरी व कष्टकरी विरोधी असून शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवून देशोधडीला लावण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी तीन काळे कृषी कायदे आणले गेलेत. Cycle rally of Congress against fuel price hike

पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडवून सर्वसामान्यांना देखील आर्थिक संकटात या मोदी सरकारने टाकले आहे. तर केंद्र शासनाच्या चुकीमुळेच कोर्टाने ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द केले आहे ,केंद्र शासनाच्या या जनता विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सायकल रॅली पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.

हे देखील पहा -

या रॅलीमध्ये जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे ,माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या आवारामधून या रॅलीला सुरुवात करण्यात आली व विभागीय आयुक्त कार्यालयावर या रॅली चा समारोप करण्यात आला. या वेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकीकडे लोकांच्या हाताला काम नाही तर दुसरीकडे प्रचंड महागाई, या दुष्टचक्रात सर्वसामान्यांबरोबरच मध्यमवर्गही भरडला जात आहे.

केंद्रशासन आणखी किती अन्याय करणार असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याने आता बेरोजगार देखील हतबल झालेले आहेत. अशा कठीण परिस्थितीत काँग्रेस या देशवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून केंद्र शासनाशी लढा देऊन सतत आंदोलन करीत आहे.

ही महागाई कमी करण्यासाठी व काळे कायदे रद्द करण्यासाठी जिल्हा काँग्रेस च्या वतीने शुक्रवारी सायकल यात्रा काढून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त कण्यात आला. जिल्हा परिषद कार्यालयासमोरून सायकल यात्रेला प्रारंभ करण्यात आला, यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पदाधिकारी विभागीय आयुक्त कार्यालयावर सायकर यात्रेच्या दरम्यान धडकले, यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT