Mobile Robbery update  saam Tv
महाराष्ट्र

चोरट्यांपासून सावधान, दोन वर्षात ११४६ मोबाईल लंपास, सायबर सेलने केली धडक कारवाई

वर्धा शहरासह जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.

साम टिव्ही ब्युरो

वर्धा : शहरासह जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. मागील दोन वर्षात मोबाईल चोरीच्या २५ घटना घडल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. याच कालावधीत ११४६ मोबाईल हरवल्याच्या (cyber cell) तक्रारी पोलीस स्थानकात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी या चोरीच्या गंभीर घटनांची दखल घेवून चोरी गेलेल्या १३ मोबाईलचा शोध लावला असून २८६ मोबाईल सापडले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी २१ चोरट्यांना अटक केली आहे. (Mobile robbery crime latest news update)

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा शहरात मोबाईल चोरीच्या घटना वाढत असतानाच सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा शोध घेतला जातो. मोबाईल चोरीला गेल्यानंतर काय करावं, या गोंधळात अनेक जण असतात. कारण काही जण मोबाईलच्या किंमतीनुसार तक्रार द्यायची का नाही, हे ठरवतात.

मोबाईलची किंमती किरकोळ असली तर तक्रार देत नाहीत आणि महागडा मोबाईल असेल तर तत्काळ पोलीस ठाणे गाठतात.तक्रार न दिल्यामुळे भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे मोबाईल चोरीला गेल्यावर तत्काळ पोलीस ठाणे किंवा सायबर सेल गाठून तक्रार करावी. अशा घटनांकडे दुर्लक्ष करू नका. तक्रार देणे नक्कीच फायद्याचे ठरेल, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित कंपनीशी आपण मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर संपर्क साधण्याची गरज आहे. त्यांना ही सर्व माहिती सांगितल्यावर ते आपला मोबाईल ब्लॉक करतात.जेणेकरुन चोरट्याला मोबाईलचा वापर करता येत नाही. चोरट्यांना मोबाईल चोरल्यावर त्यामध्ये बॅंकिग व्यवहारांबद्दल महत्वाची माहिती असल्यास त्याचा गैरवापर करून चोरटे पैसे लंपास करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ या काळात तब्बल ४७८ मोबाईल हरविल्याची नोंद सायबर सेलमध्ये घेण्यात आली आहे. यापैकी १२८ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. तर जानेवारी २०२२ ते ऑगस्टपर्यंत ६६८ मोबाईल हरविल्याची नोंद दाखल असून यापैकी १५८ मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले आहेत. नागरिकांनी बाजारपेठेत तसेच गर्दीच्या ठिकाणी जाताना मोबाईल सांभाळून ठेवण्याची गरज आहे. सायबर सेलमधील कर्मचाऱ्यांकडून चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेतला जात आहे.मोबाईल चोरीला गेल्यावर तत्काळ ऑनलाईन पोर्टल किंवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

SCROLL FOR NEXT