धक्कादायक खुलासा! करन्सी प्रेसमधील नोटा गायब प्रकरण...(पहा व्हिडीओ) अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

धक्कादायक खुलासा! करन्सी प्रेसमधील नोटा गायब प्रकरण...(पहा व्हिडीओ)

नाशिक मधील करन्सी प्रेस मधील ५ लाख रुपये गायब झाल्याच्या प्रकरणी मोठी उपडेट समोर आली आहे.

अभिजित सोनावणे

अभिजित सोनावणे

नाशिक : नाशिक Nashik मधील करन्सी प्रेस Currency press मधील ५ लाख रुपये गायब झाल्याच्या प्रकरणी मोठी उपडेट Update समोर आली आहे. करन्सी प्रेस मधील त्या ५ लाख रुपयांची चोरी झालेली नाही तर ५ लाख रुपयांची त्या नोटांच ते बंडल चुकीने पंचिंग झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

पोलिसांच्या Police तपासात शोध लागलं आहे की, कामाच्या अति तणावामुळे सुपरवायझर कडून पाच लाखांच्या नोटांच्या बंडालात छुकीने पंचिंग झाले होते. कारवाईच्या भीतीने सुपरवायझरने हे सर्व चुकून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान नोट प्रेस प्रशासनाकडून दोषी सुपरवायझरचे निलंबन करण्यात आले आहे.

दरम्यान, नाशिकच्या करंसी प्रेस नोट Currency press note मधून तब्बल पाच लाखांच्या नोटा गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तर अत्यंत गोपनीय रीत्या हि चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली होती. करंसी प्रेस नोट मधील अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून या नोटा गायब झाल्याने खळबळ माजली होती.

तसेच प्रत्यक्ष चोरी झालेल्या नोटांचा आकडा अधिक असण्याचीही शक्यता वर्तविली जात होती. चोरीच्या घटनेबाबत करंसी प्रेस नोट प्रशासनाने याबाबत मौन बाळगल्याचे समोर आले होते.

या प्रकारानंतर गोपनीय चौकशी करंसी प्रेस नोट प्रसनांकडून या संदर्भात केली जात होती. मात्र या 5 लाखांचा हिशोब लागत नव्हता. हे 5 लाख रुपये नेमके कसे गायब झाले ? की या नोटांची चोरी झाली हे कोडे आता पोलिसांनी उलघडले आहे.

पंचिंग म्हणजे काय?

- नोटा तयार करतांना काही नोटा चुकीच्या पद्धतीने प्रिंट झाल्या अथवा कटिंग चुकीची झाल्यास त्या डिफॉल्टमध्ये टाकल्या जातात.

- या डिफॉल्ट नोटांचं एक बंडल तयार करून त्याला छिद्रे पाडण्यात येतात.

- त्यानंतर संबंधित नोटा नाहीशा म्हणजेच नष्ट केल्या जातात.

- डिफॉल्ट नोटांना छिद्रे पाडणे याला नोटा पंचिंग करणं म्हणतात.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT