Curfew संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यात कर्फ्यू, १५ दिवस आंदोलन-मोर्चाला बंदी

Beed Latest News : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात पुढील १५ दिवस चार पेक्षा जास्त लोकांन एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली. पोलीस अधिक्षकांनी याबाबतचे आदेश पारीत केले आहेत.

Namdeo Kumbhar

Beed curfew News : विविध आरक्षण आंदोलनाची दाहकता लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मध्यरात्रीपासून हे आदेश लागू झाले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे करण्यासाठी जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.

मराठा, ओबीसी, धनगर, समाजाचे वतीने आरक्षण मागणी अनुषंगाने आंदोलने चालू आहेत. तसेच अगामी काळात मराठा आरक्षणाचे मागणीवरुन मनोज जरांगे हे २५ जानेवारीपासून मराठा समाजाला सोबत घेवून सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहेत. सध्या बीड जिल्ह्यामध्ये केज येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने विविध राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून सदर गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपींना कठोर शासन व्हावे या मागणी करीता अचानक आंदोलन करत आहेत. राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांचे न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने, उपोषण मोर्चे इत्यादी होण्याची शक्यता आहे.

अचानक घडणाऱ्या घटनावरुन व किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कालावधीत आरक्षणाचे मागणीसाठी सर्व समाज व राजकीय पक्ष आक्रमक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा-1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहे. १४ जानेवारीपासून २८ जानेवारीपर्यंत बीडमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे या सारखे आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही.

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला आज न्यायालयात हजर करणार

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला आज केज न्यायालयात हजर करणार आहेत. दरम्यान कराडची 14 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असून त्याचे आवाजाचे नमुने देखील घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.दुपारी तीनच्या दरम्यान कराड याला न्यायालयात हजर केले जाणार आहे, त्याआधी बीड शहर पोलीस ठाण्यातून त्याला केज येथील रुग्णालयात मेडिकलसाठी नेण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT