CRPF Recruitment 2023
CRPF Recruitment 2023 Saam Tv
महाराष्ट्र

CRPF Bharti 2023 : खुशखबर! आता मराठी भाषेतही देता येणार CRPF कॉन्स्टेबल भरती परीक्षा, केंद्रीय गृह मंत्रालयाची मान्यता

Satish Kengar

CRPF Recruitment 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता सीआरपीएफ भरती परीक्षा राज्यातील तरुणांना मराठी भाषेत देणं शक्य होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफ भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.

सीआरपीएफमध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आता सीआरपीएफ भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत घेतली जाणार आहे.

गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना त्यांच्या प्रादेशिक भाषेतून परीक्षेत भाग घेता येणार आहे. त्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढणार आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार भाग घेतात.

हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 1 जानेवारी 2024 पासून 13 प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय प्रादेशिक भाषांच्या वापर आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे.

तत्पूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आवाहन केले होते. स्टॅलिन यांनी या भरती परीक्षेत 'बेसिक हिंदी अंडरस्टँडिंग'साठी ठेवलेल्या 25 टक्के गुणांची तक्रार केली होती.

स्टॅलिन म्हणाले होते की, तमिळसोबत इतर प्रादेशिक भाषांनाही त्यात ठेवायला हवे. स्टॅलिन म्हणाले की, यामुळे तामिळनाडूतील तरुणांची सीआरपीएफ नोकरीसाठी निवड होण्याची शक्यता कमी झाली आहे. स्टॅलिन यांनी अमित शाह यांना सांगितले की, उमेदवारांना तमिळ आणि इतर भाषांमध्येही परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

SCROLL FOR NEXT