महाडमध्ये पुराच्या पाण्यात बिघडलेली वाहने दुरुस्तीसाठी वाहन चालकांची गर्दी राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

महाडमध्ये पुराच्या पाण्यात बिघडलेली वाहने दुरुस्तीसाठी वाहन चालकांची गर्दी

पुराच्या पाण्यात हजारो दुचाकी, चारचाकी वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात प्रत्येक गॅरेज समोर बिघडलेल्या वाहनाच्या रांगा दुरुस्तीसाठी दिसू लागल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने महाडमधील सावित्री नदीला पूर येऊन शहरात पूरस्थिती निर्माण झाली. यावर्षी आलेला पूर हा महाडकरांच्या चांगलाच लक्षात राहणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी महाडकरांच्या घरातील वीजेच्या वस्तूंसह वाहनांनाही फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात हजारो दुचाकी, चारचाकी वाहनांचे अतोनात नुकसान झाले. महाड आता पूर्व पदावर आले असले तरी शहरासह तालुक्यात प्रत्येक गॅरेज समोर बिघडलेल्या वाहनाच्या रांगा दुरुस्तीसाठी दिसू लागल्या आहेत. मात्र नादुरुस्त वाहनाच्या संख्येत वाहने दुरुस्ती करणारे हात आणि सामग्री मात्र तोकडी पडत आहेत. त्यामुळे महाडकरांना आपले वाहन दुरुस्त करण्यासाठी सध्या आटापिटा करावा लागत आहे. (Crowds of motorists for repairing damaged vehicles in flood waters in Mahad)

हे देखील पहा -

महाड मध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली की दरवर्षी शहरात पूरस्थिती निर्माण होते. एका ठराविक फुटापर्यंत पुराचे पाणी येत असल्याचे महाडकरांना अंदाज आहे. परंतु 22 जुलै रोजी झालेली अतिवृष्टीने महाडकरांचा दरवर्षीचा अंदाज फोल ठरविला आणि शहरात 20 ते 25 फुटांपर्यत पाणी साचले. शहरातील आंबेडकर स्मारक, चवदार तळे, शिवाजी चौक, एसटी स्थानक, नवेनगर या परिसरात पुराचे पाणी कधीच येत नाही. त्यामुळे अनेकांनी आपली दुचाकी, चारचाकी वाहने या परिसरात सुरक्षित ठिकाणी ठेवली. मात्र यावर्षी या भागातही पुराचे पाणी घुसल्याने महाडकरांची वाहने बिघडली आहेत.

पुराच्या पाण्यात नादुरुस्त झालेली वाहने दुरुस्त करण्यासाठी आता गॅरेजकडे नागरिकांनी धाव घेतली आहे. शहरातील निम्याहून अधिक वाहने ही पुराच्या पाण्यात बिघडली आहेत. त्यामुळे शहरातील गॅरेजमध्ये आता पुरानंतर नादुरुस्त वाहनांचा पूर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र मॅकेनिक कमी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची दुरुस्ती करण्यास वेळ लागणार हे मात्र नक्की. तरी शहरातील अनेक गॅरेज वाले हे वाहने दुरुस्त करण्यासाठी मोफत सेवा देत आहेत. त्यामुळे वाहने दुरुस्त होईपर्यंत वाहन चालकाला पायीच प्रवास करावा लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

SCROLL FOR NEXT