नववर्षाच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी; विठ्ठल मंदिरात फळाफुलांची मनमोहक आरास  भारत नागणे
महाराष्ट्र

नववर्षाच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी; विठ्ठल मंदिरात फळाफुलांची मनमोहक आरास

नवीन वर्षाच्या निमित्ताने विठ्ठलाच्या गाभाऱ्यात केळी, डाळिंब, सफरचंद,अननस, मोसंबी, संत्री यासह जरबेरा, कार्नेशन,बिजली,शेवंती, झेंडू, गुलाब अशा देशी विदेशी फुलांनी मंदिर सजवण्यात आलं आहे.

भारत नागणे

पंढरपूर : नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरी आज गजबजून गेली आहे. आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे. नवीन वर्षाचं स्वागत आणि विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपूरमध्ये येतात.

आजही नवीन वर्षाच्या निमित्ताने पंढरी (Pandharpur) नगरी फुलून गेली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि विठ्ठल रुक्मिणी (Vitthal Rukmini) च्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये तोच उत्साह आणि भक्ती दिसून येत आहे तसेच शासनाने लावलेले कोरोना निर्बंधाचे पालन देखील विठ्ठलभक्त करत आहेत.

मंदिरात फळाफुलांची मनमोहक आरास -

नवीन वर्षाच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फळांची आणि फुलांची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनीही आरास केली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक भाविक आज विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

हे देखील पहा -

नवीन वर्षाच्या निमित्ताने विठ्ठलाच्या गाभाऱ्यात केळी, डाळिंब, सफरचंद,अननस, मोसंबी, संत्री यासह जरबेरा, कार्नेशन,बिजली,शेवंती, झेंडू, गुलाब अशा देशी विदेशी फुलांनी देवाचा सजवण्यात आला आहे. यासाठी पंधराशे किलो फुलांचा व एकटं फळांचा वापर करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

Social Media: फेसबुक, इन्स्टाग्राम की एक्स; सर्वाधिक कमाई कुठून होते? वाचा सविस्तर

Sprouted Potatoes Risk : मोड आलेले बटाटे खाताय? आरोग्याला निर्माण होईल मोठा धोका, तज्ज्ञांचा इशारा

Param Sundari vs Baaghi 4 : 'परम सुंदरी' की 'बागी 4' बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? टायगर श्रॉफच्या चित्रपटाने 5व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Shocking: बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी चोरी, घरफोडीचा बनाव रचला; मुलीच्या प्रियकरासोबतही..., महिलेने केलं भयंकर कांड

SCROLL FOR NEXT