पंढरपुरात कोरोना काळात राष्ट्रवादीच्या मेळाव्याला गर्दी... भारत नागणे
महाराष्ट्र

पंढरपुरात कोरोना काळात राष्ट्रवादीच्या मेळाव्याला गर्दी...

कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पंढरपुरात पुन्हा कोरोनाचा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

भारत नागणे

पंढरपूर - रेड झोन असलेल्या पंढरपूर Pandharpur तालुक्यातील कासेगाव Kasegaon येथे आज राष्ट्रवादीच्या NCP मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकत्यांनी मोठी गर्दी केली होती. मेळाव्यामध्ये सोशल डिस्टन्सींगचा Social Distance पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.

कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पंढरपुरात पुन्हा कोरोनाचा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. विधानसभा पोटनिवडणुकी दरम्यान पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात कोटोणबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. याचे परिणाम आजपर्यंत लोकांना भोगावे लागत आहेत.

हे देखील पहा -

सोलापूर जिल्ह्यात आज सर्वाधिक रुग्ण हे पंढरपूर तालुक्यात असताना देखील पक्षाच्या मेळाव्याला मोठी गर्दी होत असल्याने पोलीस काय कारवाई करणार याकडे आता सर्व्यांचे लक्ष लागलेले आहे.पंढरपूर तालुक्यातील कासेगाव आणि परिसरात जवळपास 20 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे.

कासेगाव हे रेड झोन मध्ये असताना देखील याच गावांमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. सभा आणि मेळाव्यामुळे पंढरपुरात कोरोना वाढल्याचे ताजे उदाहरण असताना देखील पुन्हा पक्षाचे पदाधिकारी कधी धडा घेणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत राजकीय खळबळ! अजित दादा सुपुत्र जय पवारांना उतरवणार रणांगणात? VIDEO

Cooker Cleaning : १० मिनिटांत कुकरचा काळपटपणा घालवा, वाचा घरगुती रामबाण उपाय

4th November Rashi Bhavishay: करिअर अन् पैशांत होणार मोठी वाढ, या 5 राशींचे नशीब आज चमकणार

नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; बर्फाचा भलामोठा पर्वत कोसळला; ७ गिर्यारोहकांचा जागीच मृत्यू

Shukra Gochar 2025: धनदाता शुक्र पापी ग्रहाच्या घरात करणार प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT