परभणीत ढगफुटीसदृष्य पावसामुळे पिकं पाण्याखाली; घरांचही मोठं नुकसान राजेश काटकर
महाराष्ट्र

परभणीत ढगफुटीसदृष्य पावसामुळे पिकं पाण्याखाली; घरांचही मोठं नुकसान

पाथरी तालुक्यातील हादगाव, कासापुरी मंडळात मंगळवारी पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजेपर्यंत जोरदार पाऊस बरसला. ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने ओढे-नाले तुडुंब भरुन वाहत होते.

राजेश काटकर

परभणी: पाथरी तालुक्यातील हादगाव, कासापुरी मंडळात मंगळवारी पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजेपर्यंत जोरदार पाऊस बरसला. यात हातगाव मंडळात १३०.८ मिमी तर कासापुरी मंडळात १०६.८ मिमी पाऊस झाल्याने शेतातील खरीपाची पिके पाण्याखाली गेली. तर हातगाव बु. मध्ये घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. (Crops submerged due to cloudburst rains in Parbhani; Large damage due to water intrusion in the house)

हे देखील पहा -

तालुक्यात मागील काही दिवसांपासुन मोठा खंड पडला होता. गत आठवड्यात रिमझिम पाऊस झाल्यानंतर मंगळवारी पहाटे तालुक्यातील पाथरी, हादगाव, बाभळगाव, कासापुरी या चारही महसुल मंडळात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पहाटे तीन ते सकाळी नऊच्या दरम्यान हादगाव मंडळात जोरदार पाऊस झाला. यात एकट्या हादगाव मंडळात १३०.८ एवढा ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने ओढे-नाले तुडुंब भरुन वाहत होते. तर शेतांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र दिसुन येत आहे. यात सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून जमिनी खरडल्या आहेत. तर हातगाव बु. मधील अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याचे या ठिकाणचे नागरीक पप्पू नखाते यांनी सांगितले.

या ढगफुटीसदृष्य पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. असाच काहीसा प्रकार कासापुरी महसुल मंडळात झाला असून या ठिकाणी १०६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर बाभळगाव मंडळात ६२.३ तर पाथरी मंडळात ५५ मिमी पावसाची नोंद सरकारी दफ्तरात झाली असून सरासरी ८८.७ मिमी पाऊस जो की अतिवृष्टी मानला जातो एवढा पाऊस झाल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT