Prahar Shetakari Sanghatana 
महाराष्ट्र

Crop Insurance: नुकसानाचा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशांची डिमांड; प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून अधिकाऱ्याला चोप

Prahar Shetakari Sanghatana: प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून पीक विमा कंपनीच्या तालुका मॅनेजरला मारहाण झालीय. नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्याने प्रहार संघटनेने अधिकाऱ्याला चोप दिलाय.

Bharat Jadhav

विजय पाटील, साम प्रतिनिधी

पीक विमा अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी विमा अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात आहे. सांगलीतील वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पीक विमा काढणाऱ्या अधिकारी पैशांची मागणी करत आहे. पैशांची मागणी करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना प्रहार शेतकरी संघटनेने चांगलाच चोप दिलाय.

सांगलीच्या वाळवा तालुक्यात पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पीक नुकसान पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याची घटना समोर आली. शेतकऱ्यांची आप बीती ऐकल्यानंतर प्रहार संघटनेनेचे पदाधिकाऱ्यांनी थेट तालुक्या कृषी अधिकाऱ्याचं ऑफिस गाठत विमा अधिकाऱ्याचा समाचार घेतला. कृषी अधिकाऱ्यासमोर पैसे का मागितल्याचा जाब विचारत प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने विमा अधिकाऱ्याच्या कानाखाली जाळ काढला.

पंचनामा करताना शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी केल्याने प्रहार शेतकरी संघटनेने संबंधित पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला चोप दिला. तालुका कृषी अधिकाऱ्या समोरच विमा अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. नुकताच झालेल्या पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले आहे. शेतीचे पंचनामा सुरू आहेत. यावेळी इस्लामपूर चे शेतकरी याचे 60 गुंठे सोयाबीन पीक होते.

त्याचा पंचनामा करण्यासाठी 1 हजाराची मागणी करण्यात आली. नाही दिले तर पीक विमा मंजूर होणार नाही, असे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी आपली कैफियत प्रहार संघटनेकडे मांडली. त्यानंतर प्रहार संघटनेच्या पदाधिकारी कृषी कार्यालयात गेले आणि त्यांनी तेथे जाब विचारला. पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला तालुका कृषी अधिकाऱ्यासमोरच चोप दिला. यावेळी परिसरातील शेतकरी व प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित शेतकऱ्यांकडे पैसे मगितल्याचे निष्पन्न झाले आहे. योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच असा प्रकार घडत असेल तर शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात संपर्क साधावा असे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

बऱ्याचवेळा पीक विमा काढताना शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊनचा सामना करावा लागतो. त्यामुळे वेळे पीक विम्याची नोंदणी करता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. अशीच एक घटना हिंगोलीत काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT