Dengue : अंगावर पुरळ, तीव्र ताप अन्..., डेंग्यूच्या 'या' छुप्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे ठरेल जीवघेणे

Shreya Maskar

पावसाळ्यात

पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचा धोका प्रचंड वाढतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. स्ट्रीट फूड टाळा आणि ओलाव्यापासून दूर रहा.

rainy season | pinterest

डेंग्यूचे टप्पे

डेंग्यूचे ३ टप्पे असतात. यात फेब्रिल फेज, गंभीर टप्पा आणि रिकव्हरी फेज यांचे समावेश असतात. सुरुवातीची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Stages of dengue | pinterest

तीव्र ताप

तीव्र ताप येणे हे डेंग्यूचे सामान्य लक्षण आहे, मात्र हा ताप जास्त असतो. तापाचे औषध घेऊनही शरीराचे तापमान कमी होत नसेल आणि तापासोबत थंडी वाजून येणे, अस्वस्थता जाणवत असेल तर तो डेंग्यू ताप असू शकतो.

high fever | pinterest

अंगदुखी

स्नायू दुखणे आणि अशक्तपणा जाणवतो. तापाबरोबरच तुम्हाला तीव्र डोकेदुखी किंवा डोळ्यांमध्ये वेदना आणि प्रखर प्रकाशाचा तिरस्कार वाटू शकतो.

body pain | pinterest

त्वचेवर पुरळ

ताप उतरल्यानंतर काही दिवसांनी त्वचेवर पुरळ किंवा लालसरपणा दिसल्यास, ही डेंग्यूची लक्षणे असू शकतात. ही पुरळ सुरुवातीला छातीवर दिसतात आणि नंतर शरीराच्या इतर भागांवर पसरतात.

body ache | pinterest

रक्तस्राव

काही लोकांना हिरड्यांमधून रक्त येणे, नाकातून रक्त येणे किंवा किरकोळ जखमा होणे यांसारखे त्रास होऊ शकतात. भूक न लागणे, सतत उलट्या आणि मळमळ होणे.

Bleeding | pinterest

श्वास घेण्यास त्रास

पोटात तीव्र वेदना होतात. सतत उलट्या होतात आणि उलट्यांमध्ये रक्त येते. रुग्णाचा श्वास खूप वेगाने सुरू होतो.

breathing | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : जिमसाठी वेळ नाही? घरातील 'ही' २ कामं करून वजन करा कमी

Weight Loss Secrets | AI PHOTO
येथे क्लिक करा...