crocodile (file photo) 
महाराष्ट्र

दुधगंगा नदीकाठी आली मगर; कसबा वाळवेत वन विभाग सतर्क

वन विभागाने तातडीने मगर पकडून तिचा बंदाेबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

साम न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : काेल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील राधानगरीतील कसबा वाळवे येथील दुधगंगा नदीत (dudh ganga river) मगरीचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. या भागात मासे मारीसाठी गेलेल्या ऊसताेड कामगारांना मगर दिसली. त्यांनी संबंधित मगरीचे छायाचित्र काढले. तसेच चित्रीकरण देखील केले. समाज माध्यमांवर काही वेळेतच पाेस्ट झालेली मगर प्रत्यक्षात पाहण्यासाठी ग्रामस्थांनी दुधगंगा नदीवर गर्दी केली. kolhapur news

गेल्या काही दिवसांपासून काेल्हापूर जिल्ह्यात पाऊस झाला. अवकाळी पावसाने बहुतांश भागात चिखल साचला. परिणामी ऊस ताेडी देखील थांबली आहे. कसबा वळवे या भागातील काही ऊसताेड कामगार हे दुधगंगा नदीवर मासेमारीसाठी गेले हाेते. तेथे त्यांना मगर दिसली.

दूधगंगा नदी काठावर विनाकारण काेणीही जाऊ नये. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे. दरम्यान वनविभागाने तातडीने मगर पकडून तिचा बंदाेबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

Hruta Durgule: ‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा ! हृता दुर्गुळे - सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातात मोठी कारवाई, २ इंजिनिअर आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Garlic Chutney: वरण भातासोबत पापड नको, फक्त ५ मिनिटांत तयार करा झणझणीत लसूण आणि पुदिना चटणी

SCROLL FOR NEXT