चंद्रपूर : चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील वरोरा शहरात क्रीडा स्पर्धे प्रसंगी प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने २० प्रेक्षक जखमी झाले आहेत. या जखमींपैकी काही गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले आहे. वराेरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आमदार करंडक कबड्डी स्पर्धा आयाेजिली आहे. या स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उदघाटना समारंभास माेठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित हाेते. तेथील लाकडी प्रेक्षक गॅलरीवर नागरिकांचा भार पडल्याने गॅलरी पत्त्यासारखी कोसळली. kabbadi competition in chandrapur varora city
या घटनेत साधारणतः २० प्रेक्षक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये छाेट्या मुलांचा समावेश आहे. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाली आहेत. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही स्पर्धा काँग्रेसचे (congress) आमदार प्रतिभा बाळू धानोरकर यांच्या वतीने आयाेजित करण्यात आली आहे. कबड्डी स्पर्धेच्या उदघटानानंतर हाेणारे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली. त्यातून गॅलरी पडली. तातडीने काही गंभीर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यासाठी संयाेजकांसह नागरिकांना धावाधाव केली अशी माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.