nashik crime news Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: किरकोळ वादातून मालेगावात एकाचा खून; आझाद नगर भागातील घटना

मालेगाव शहरात खूनांचे सत्र सुरूच आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक - मालेगाव (Malegaon) शहरात खूनांचे सत्र सुरूच आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असून यामुळे शहरातील नागरिक दहशतीखाली राहत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या घटनांनी मालेगावात पोलिसांच्या (Police) कार्यक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गेल्या दोन दिवसांत दुसरा खून मालेगावात झाला आहे.

हे देखील पहा -

मागील भांडणात झालेले वाद मिटविण्यासाठी जमलेल्या मित्रांच्या बैठकीतच एका तरुणावर जमावाने तलवारीने हल्ला करत त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरात मध्य रात्री दिड वाजेच्या सुमारास घडली. मोहम्मद इब्राहिम समसुदोहा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून मालेगावात खुन केला जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अफजल खान, कासीम, असलम खान, जफर उल्ला खान, अमन उल्ला खान ऊर्फ पहिलवान, वसीम भांजा यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व संशयित आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद इब्राहिम याला उपचारार्थ सामान्य रुग्णालय आणि तेथून खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

SCROLL FOR NEXT