Latur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: मोठी बातमी! बीडमधील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Case Register Agaist NCP Leader: बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याविरोधात लातूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने मित्राची हत्या केली.

Priya More
  • लातूरमध्ये बिर्याणी खाण्यावरून तरुणाची हत्या

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाविरोधात हत्या प्रकरणी गुन्हा

  • परळीच्या नगरसेवकाचा लातूर हत्या प्रकरणात समावेश

  • बिर्याणीवरून झालेल्या वादातून लातूरमध्ये हत्याकांड

संदीप भोसले, लातूर

लातूरमध्ये बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. लातूरच्या उस्मानपुरा भागात ही घटना घडली. ३ तरुणांनी मित्रावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हत्या झालेला तरुण आणि आरोपी हे बीडच्या परळीमधील आहेत. ते सर्वजण लातूरमध्ये बिर्याणी खाण्यासाठी आले होते. आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकाचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या उस्मानपुरा भागात हत्याकांडाची ही धक्कादायक घटना घडली. लातूरमध्ये बीडच्या परळीतून बिर्याणी खाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नगरसेवक आणि त्याचे ३ मित्र आले होते. या ४ मित्रांमध्ये हॉटेलमध्ये जेवताना वाद झाला. या वादात बाबा अली शेख या तरुणाची चाकूने सपासप वार करत हत्या करण्यात आली. हत्याकांडानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह तिन्ही मारेकरी फरार झाले असून लातूर पोलिस या आरोपींचा शोध घेत आहे.

हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक खालिद शेख, बाबा अली शेख, अल्फाज पठाण आणि उमर अशी या ४ मित्रांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. मयत बाबा अली शेखसोबत इतर तिघांचा हॉटेलमध्ये जेवताना वाद झाला आणि त्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान जेवण करताना हॉटेलमध्ये वाद सुरू असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आला आहे. पोलिसांनी या घटने प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फेरमतदानात भाजपचा दारुण पराभव, काँग्रेसच्या जागा वाढल्या; सत्ता परिवर्तन होणार?

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचे ऑडिट होणार

वीज पडून पती-पत्नीसह ५जणांचा मृत्यू; ऐन गणेशोत्सवात छत्रपती संभाजीनगरात शोककळा

सोन्याची खाण कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकून 82 जणांचा करूण अंत

HSC- SSC Exam Date: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, कधी असेल पहिला पेपर?

SCROLL FOR NEXT