Leopard Acquitted Of Killing Charges  saam tv
महाराष्ट्र

Crime News: बिबट्या सुटला निर्दोष; नाव बिबट्याचं काम पुतण्याचं, पोलिसांनी लावला खूनाचा छडा

Crime News: एका बिबट्याची खुनाच्या आरोपातून चक्क निर्दोष सुटका झालीये. पोलिस आणि वन विभागानं या प्रकरणाची कसून तपासणी केल्यामुळे बिबट्या दोषमुक्त झालाय.

Vinod Patil

दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये एका बिबट्याची खुनाच्या आरोपातून चक्क निर्दोष सुटका झालीये. पोलिस आणि वन विभागानं या प्रकरणाची कसून तपासणी केल्यामुळे बिबट्या दोषमुक्त झालाय. नेमका काय आहे हा सगळा प्रकार? चला पाहूयात.

एका महिलेच्या मृत्यूनं दौंड तालुक्यातील कडेठाण गाव हादरून गेला होतं...लताबाई धावडे असं या महिलेचं नाव.. उसाच्या शेतात काम करणाऱ्या लताबाईंवर बिबट्यानं हल्ला केला आणि त्या मरण पावल्या अशी गावात चर्चा सुरू झाली. अनिल धावडे यानं लताबाईंच्या मृत्यूची फिर्याद पोलिसात दिली. आपल्या फिर्यादीत त्याने लताबाईंचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचं नमूद केलं.

मात्र पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच लताबाईंचा मृतदेह उसाच्या शेतातून हलवण्यात आला होता. त्यामुळे वनविभागाला त्यांच्या मृत्यूबाबत शंका आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह वन विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. लताबाईच्या मृत्यू प्रकरणात बिबट्या निर्दोष ठरला. त्यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नव्हे तर दगडाने ठेचून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.

पोलिसांनी फिर्यादीची कसून चौकशी केली आणि बिंग फुटलं. लताबाईंच्या पुतण्यानेच दगडानं ठेचून त्यांचा खून केला असल्याचं तपासात उघड झालय. याप्रकरणी यवत पोलिसांनी सतिलाल वाल्मीक मोरे आणि अनिल पोपट धावडे या दोन आरोपींना अटक केलीय. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येतंय.

गुन्हा केल्यानंतर आपण कुठे अडकू नये यासाठी आरोपींनी बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव केला. मात्र म्हणतात ना, कानून की हात लंबे होते है...या उक्तीप्रमाणे उशिरा का होईना सत्य समोर आलं. या प्रकरणात बिबट्या निर्दोष सुटला आणि खरे आरोपी गजाआड झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT