Sangli News Saam TV
महाराष्ट्र

Sangli Crime News : सांगली हादरली! आरडाओरड, किंचाळ्या.. सिनेस्टाईल पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणाला भररस्त्यात संपवलं

Sangli News : माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.

विजय पाटील

Sangli News : सांगली शहरामध्ये अंगावर थरकाप उडवणारी घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. भर रहदारीच्या ठिकाणी थरारक सिनेस्टाईल पाठलाग करत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.

राजवर्धन राम पाटील असं 18 वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. राजवर्धन वसंतदादा औद्योगिक परिसरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तपास सुरू केला आहे. मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. (Latest News Update)

सायंकाळी सहाच्या सुमारास वसंतदादा साखर कारखान्याच्या गेट समोर राजवर्धन पाटील हा पळत होता आणि त्याच्या मागे तीन ते चार तरुण हातामध्ये चाकू आणि कोयता घेऊन पाठलाग करत होते. कारखाना गेटच्या हद्दीत या हल्लेखोरांनी राजवर्धनला गाठून त्याच्यावर कोयता आणि चाकूने वार करत त्याची हत्या केली. (Crime News)

राजवर्धन राम पाटील हा मूळचा तासगाव तालुक्यातल्या मतकुणकी या गावचा असून सध्या तो बुधगाव या ठिकाणी राहत होता. सायंकाळी वसंतदादा कारखाना परिसरात आला असता हल्लेखार तरुण व राजवर्धन यांच्यामध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर थरारक पाठलाग करत हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

ज्या तरुणांनी ही ही हत्या केली ते कोण होते? कोणत्या कारणातून ही हत्या करण्यात आली? हे स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News:पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश,राजकीय वर्तुळात खळबळ

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

SCROLL FOR NEXT