Aurangabad Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News : औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला भररस्त्यात संपवलं

पुणे महामार्गावर भरदिवसा एका तरुणांची कुऱ्हाडीचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

डॉ. माधव सावरगावे

Aurangabad Crime News : औरंगाबाद जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. पुणे महामार्गावर भरदिवसा एका तरुणांची कुऱ्हाडीचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने ही हत्या केल्याची प्राथामिक माहिती आहे. या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

बापू खिल्लारे (वय 30 वर्ष) असं हत्या (Crime News) झालेल्या तरुणाचं नाव आहे. भररस्त्यात बापू याची हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्राप्त माहितीनुसार, बापू खिल्लारे याने ३ वर्षापूर्वी सासरच्या नातलगांचा विरोध झुगारून पळून जाऊन एका तरुणीशी प्रेम विवाह केला होता.

गुरूवारी (29 डिसेंबर) बापू हा औरंगाबाद-पुणे महामार्गावरून (Aurangabad) दुचाकीने जात असताना त्यांच्या मेव्हण्याने महामार्गावरील दहेगाव बंगला जवळील इसारवाडी फाटा येथे अडविलं कुठलिही विचारपूस न करता धारदार कुऱ्हाडीने बापू यांच्यावर हल्ला चढविला.

आरोपीने बापू याच्यावर कुऱ्हाडीने एका नंतर एक असे सपासप वार केले. यामध्ये बापू हा रस्त्यावरच कोसळला. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा बापू रस्त्यावर तडफडत होता. त्याच वेळी मारेकरी हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड खांद्यावर ठेऊन तो प्रसंग पाहत उभा होता. हे भयावह दृश्य पाहून महामार्गाने जाणारे वाहनधारक देखील भयभीत झाले होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तडफडणाऱ्या बापू खिल्लारे याने रस्त्यावरच जीव सोडला. त्याच्या मृत्युची खात्री होताच मारेकऱ्यानं अंगावरील शर्ट काढला आणि तो शर्ट हवेत गोल फिरवत जल्लोष केला. तेथे नृत्य केलं आणि दुचाकीवरुन तिथून पसार झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बापू याचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. हत्येनंतर आरोपी पसार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधात दोन पथके रवाना केली आहे. भररस्त्यात घडलेल्या या ऑनर किलिंगच्या घटनेनं परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT