Solapur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: सोलापूर हादरलं! एकाच झाडाला गळफास घेत प्रेमी युगूलाची आत्महत्या; परिसरात खळबळ

घटनास्थळावर कॉलेजची एक बॅग आणि एक दुचाकी पोलिसांना आढळून आली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur: एकाच झाडाला गळफास घेत युवक- युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. उत्तर सोलापूरमधील कवठे गावात ही घटना घडली असून गळफास घेणारे प्रेमी युगूल असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूरमधीलकवठे शिवारातील एका लिंबाच्या झाडाला युवक युवतीने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना तेथील नागरिकांना कळताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली ज्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल आहे. लक्ष्मी शिवाजी तांबे असे मृत युवतीचे नाव असून ती ११ वीला भारतीय विद्यापीठात शिकत असल्याची माहिती समोर आली आहे.

तर सुरज कुंडलीक चव्हाण (रा. खुनेश्र्वर तालुका, मोहोळ जिल्हा सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच दोघांनाही छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, घटनास्थळावर कॉलेजची एक बॅग आणि एक दुचाकी पोलिसांना आढळून आली आहे. या युवक युवतीने आत्महत्येचा निर्णय का घेतला, ही आत्महत्या आहे की घातपात अशा अनेक प्रश्नांचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Solapur News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा मेट्रोतून प्रवास

Anant Chaturdashi 2026: मुंबई-पुण्यात बाप्पाला निरोप; विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, भक्तांची अलोट गर्दी

Without Sugar Tea: चहामध्ये साखर टाकणे बंद केल्यास शरीरात होतात 5 मोठे आश्चर्यचकित बदल

Political News : शिंदे सेनेच्या आणखी एका नगरसेवकाच पद धोक्यात, अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने बजावली नोटीस

Beetroot Rice Recipe : रोजच्या भाताला द्या भन्नाट ट्विस्ट! झटपट बनवा चविष्ट बीटरूट राईस, चेहऱ्यावरही दिसेल गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT