jalna News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : जालना हादरलं! पैशांच्या देवाणघेवाणीवरून तरुणाची सटकली; महिलेचा गळा आवळला अन्...

Jalna Crime News : जालना जिल्ह्यात पैशांच्या वादातून महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • जालन्यात कपाशीच्या शेतात महिलेचा मृतदेह सापडून खळबळ

  • पैशांच्या वादातून आरोपीने गळा आवळून हत्या केल्याची कबुली

  • गुन्हा दाखल करून तपास सुरू

  • आरोपी अटकेत

अक्षय पाटील, जालना

पूर्वी एखादी वस्तू किंवा पैसे घेतल्यानंतर मोठ्या मनाने हात सैल करून ते परत दिले जायचे. जरी ती वस्तू किंवा पैसे द्यायला उशीर झाला तर सामंजस्याने त्याच्यावर तोडगा काढला जात होता. मात्र आता थोड्या थोडक्या कारणांवरून माणसांचा राग प्रकोपाला जाताना दिसतो. अशीच एक घटना जालनामधून समोर आली आहे. शेतशिवारात एका महिलेचा मृतदेह हत्या केलेल्या अवस्थेत सापडला. धक्कादायक म्हणजे पैशांच्या देवाणघेवाणीवरून ही हत्या झाल्याचं उघड झालं. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील खडकी गावाच्या शिवारात कपाशिच्या शेतात उषाबाई भास्कर सदाशीवे या ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हसनाबाद पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्र वेगाने फिरवली. गुन्ह्यातील अज्ञात व्यक्तीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारांमार्फत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचा चांदई टेपले येथील शरद शिवाजी राऊत चांदई टेपले यांच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण असल्याची माहिती समोर आली.

त्यांनतर आरोपीचा मोबाईल नंबर हस्तगत करून त्याचं टॉवर लोकेशन वरून ठावठिकाणा शोधण्यात आला. त्याचं लोकेशन जावळेवाडी शिवारातील शेतातील घरी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्या घरी धाव घेतली, शिवाय त्याला तात्काळ संशयित म्हणून ताब्यात घेत त्याची सखोल विचारपूस केली. या चौकशीदरम्यान आरोपीने आपणच हा गुन्हा केल्याची कबुली दिली पोलिसांसमोर आहे.

पैशाच्या देवाण-घेवाणी मधून आरोपी आणि मृत महिलेमध्ये काही दिवसापूर्वी वाद असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली आणि त्यातूनच आरोपीने हत्या केल्याचं म्हटलं. आरोपीने महिलेचा स्कार्पने गळा आवळून हत्या केली यानंतर मृतदेह कपाशीच्या शेतात टाकून तो पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच आरोपीला ताब्यात घेतलं असून त्या विरुद्ध हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार, खासदार, नगरसेवक त्यांचेच आणि चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील, जैन मुनींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: किल्ले रायगडावर व्यावसायिक अतिक्रमण ?

धुळ्यात अवैध देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; झोपड्यांवरही बुलडोझर फिरवला

Loan Tips: पहिल्यांदा लोन घेत असताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे?

Weather Update : पुढील ४८ तास महत्त्वाचे! ऐन हिवाळ्यात मुसळधार पाऊस कोसळणार, कोणत्या राज्यांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT