Crime : जमिनीचा वाद, मित्रांच्या मदतीने केली चुलत भावाची निर्घृण हत्या! रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

Crime : जमिनीचा वाद, मित्रांच्या मदतीने केली चुलत भावाची निर्घृण हत्या!

जमिनीच्या वादावरुन चुलत भावाने मित्रांच्या मदतीने धारदार हत्याराने वार करुन चुलत भावाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना खेड तालुक्यात घडली आहे.

रोहिदास गाडगे

खेड : जमिनीच्या वादावरुन चुलत भावाने मित्रांच्या मदतीने धारदार हत्याराने वार करुन चुलत भावाची निर्घृण हत्या करत मृतदेह चास-कमान धरणाच्या डाव्या कालव्यात फेकुन दिल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात घडली आहे. राहुल मोहिते असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून राहुल हा पुर्वीचा सराईत गुन्हेगार आहे.

राहुल मोहिते हा चुलता आणि चुलत भाऊ यांच्याबरोबर जमिनीवरुन नेहमी वाद करत होता. या वादाचा राग मनात धरुन शंकर मोहिते आणि सचिन मोहिते यांनी मित्रांच्या मदतीने राहुल मोहिते याच्या खुनाचा कट रचला आणि त्याच्यावर धारदार हत्याराने डोक्यात, पाठीत, तोंड, गळ्यावर आणि हातावर वार करुन निर्घृणपणे खून केला आणि मृतदेह कालव्यात फेकुन दिला. या हत्येचा तपास करत राजगुरुनगर पोलीसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सराईत गुन्हेगार राहुल मोहिते यांच्या खुनाचा गुन्हा राजगुरुनगर पोलीसांनी तपास करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलीस निरिक्षक सतिष गुरव, पोलीस हवालदार, स्वप्निल गाढवे, निखील गिरीगोसावी, सचिन जीतकर, शेखर भोईर कारवाई केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High cholesterol: औषधं न घेता कसं कमी कराल कोलेस्ट्रॉल? डॉक्टरांनी सांगितलं काय खावं आणि काय खावू नये!

Maharashtra News Live Update: मुंबईच्या वडाळा पूर्व गणेश नगर येथे रात्री उशिरा मोठा अपघात

Ladki Bahin Yojana : नवरात्री सुरू झाली, लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1500 कधी येणार? महत्वाची अपडेट आली समोर

Accident: नवरात्रोत्सवाला गालबोट! तुळजाभवानीची ज्योत घेऊन येताना भाविकांवर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू

Bigg Boss 20 : सलमान खानने सदस्यांना दिला मोठा धक्का, बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एन्ट्री

SCROLL FOR NEXT