16 वर्षीय मुलीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असणाऱ्या 28 वर्षीय नवऱ्यावरती गुन्हा  SaamTV
महाराष्ट्र

16 वर्षीय मुलीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असणाऱ्या 28 वर्षीय नवऱ्यावरती गुन्हा

केंद्र सरकार मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा 18 वरून 21 करण्याच्या प्रयत्नात असतानाच औरंगाबाद शहरात मात्र 16 वर्षीय मुलीचे लग्न लावण्याचा प्रकार समोर आला आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : केंद्र सरकारकडून मुलींच्या लग्नाची (Girls' Marriage Age) वयोमर्यादा वाढवण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर राजस्थानामध्ये मुलींची लग्न लावण्याचे प्रकार वाढले असतानाच आता असाच एक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. केंद्र सरकार मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा 18 वरून 21 करण्याच्या प्रयत्नात असतानाच औरंगाबाद शहरात मात्र 16 वर्षीय मुलीचे लग्न लावण्याचा प्रकार समोर आला आहे.

बाल कल्याण समितीला (Child Welfare Committee) या लग्नाबाबत माहिती मिळाल्यानंतर हा बालविवाह थांबण्यात आला आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातील बदनापूर येथील शेतकरी कुटुंबातील 16 वर्षीय मुलगी आणि औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील देवगाव-कडेगाव येथील 28 वर्षीय सचिन नारळे याचा विवाह 24 डिसेंबर रोजी मुकुलनगर येथील सप्तशृंगी माता मंदिरात आयोजित करण्यात आला होता. मुलीचे शिक्षण 10 वीपर्यंत झाले आहे. सचिनची शेती चांगली असल्याने मुलीच्या आई-वडिलांनी 16 व्या वर्षीच तिचे लग्न लावून देण्याचे ठरवले होते.

हे देखील पहा -

या बालविवाहाची माहिती मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या (Mukundwadi Police Station) निरीक्षकांना कळताच त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना कळवले. सहायक निरीक्षक शिवाजी चौरे यांनी घटनास्थळी जात लग्न थांबवले बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून मुलीच्या वडिलांसह सचिन नारळे, सुमनबाई नारळे, कचरू नारळे यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

SCROLL FOR NEXT