Boisar Cricket Player Saam Tv
महाराष्ट्र

Palghar Accident: क्रिकेट खेळाडूंच्या कारला भीषण अपघातात; दोघांचा मृत्यू, ४ जण जखमी

Boisar Cricket Player : गिरनोळी चहाडे नाका रस्त्यावर करवेले जवळ भरधाव कारचा अपघात झाला. या कारमधील युवक क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी जात होते. धोकेदायक वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार ४ वेळा पलटली.

Bharat Jadhav

Boisar Cricket Player Car Accident In Palghar :

क्रिकेट क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या युवकांच्या कारचा भीषण अपघात झालाय. पालघरमध्ये बोईसरजवळ हा अपघात झालाय. गिरनोळी चहाडे नाका रस्त्यावर करवेले जवळ भरधाव कारचा अपघात झाला. या कारमधून प्रवास करणारे युवक हे क्रिकेट क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी जात होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवकांवर अधिकारी लाइफ लाइन्स या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धोकादायक वळणावर भरधाव कारवरील वाहन चालकाच नियंत्रण सुटल्याने कारने ३ ते ४ पलटी मारल्या. (Latest News)

खडे चुकवण्याच्या नादात अपघात

खड्डे चुकण्याचा अंदाज न आल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. चहाडे- गुंदले रस्त्यावर गरवाशेत येथे नियंत्रण सुटल्याने टायर फुटून कार पलटी झाली. यात चंद्रकांत जगदिश पाटील (वय ४०) आणि ऊत्कर्ष किशोर राऊत ( २७) (राहणार भादवे)या दोघांचा मृत्यू झाला.तर चार जण गंभीर जखमी झालेत. जखमी मयूर वैद्य, धीरज यांना बेटेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

परवाच्या दिवशी झाला होता अपघात

बोईसर- चिल्हार रस्त्यावरील गुंदले येथील दोन बंगला येथील क्रॉसिंगवर एक कार आणि एका दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी (ता ०२) झाला होता. भरधाव जीपने अचानक वळण घेणार्‍या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी बाळू हेमाडा यांचा वलसाड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पालघर तालुक्यात अपघातांची मालिका सुरू आहे. मागील तीन दिवसांत तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांत चार जणांचा मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Men Hair Care: मुलांनी दररोज केस धुवावे का?

Banjara Community: हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा; नाहीतर बंजारा समाज रस्त्यावर उतरून लढाई लढेल|VIDEO

Maharashtra Live News Update: : - विसर्जनाच्या रात्री पुणे मेट्रोत तुफान गर्दी

Ganpati visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्येचा थरार, तरुणावर चाकूने वार; घटनेचा Video Viral

Garba Dress: गरबा नाईटसाठी 'हे' ट्रेंडी आणि कम्फर्टेबल आउटफिट यावर्षी नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT