अहमदनगरमध्ये माकपचे जोरदार शक्तीप्रदर्शन ! गोविंद साळुंके
महाराष्ट्र

अहमदनगरमध्ये माकपचे जोरदार शक्तीप्रदर्शन !

शेतकरी, कामगार, कर्मचारी व आदिवासी समुदायाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज अहमदनगरच्या अकोले शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

गोविंद साळुंके

अहमदनगर : शेतकरी, कामगार, कर्मचारी व आदिवासी समुदायाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज अहमदनगरच्या अकोले शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाचे नेत्वृत्व किसान सभेचे अजित नवले यांनी केले.

हे देखील पहा -

अकोले व संगमनेर तालुक्यातील सर्व श्रमिकांना घरकुले द्या, घरकुल ड यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू करा, बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करा, घरेलू कामगारांची नोंदणी तातडीने सुरू करा, घरेलू कामगारांना कोविड काळातील अनुदान तातडीने द्या, आशा कर्मचाऱ्यांना रुग्णालयात मुक्कामाची स्वतंत्र व्यवस्था करा या मागण्या घेऊन माकपने आंदोलनाची हाक दिली होती.

लॉकडाउन काळात प्रलंबित असलेल्या श्रमिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सिटू कामगार संघटनांच्या वतीने 9 ऑगस्ट पासुन अकोले तहसील कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह सुरू आहे. आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी माकपने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले. मोर्चामध्ये शेतकरी,आदिवासी व श्रमिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT