BMC अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी केली पवई तलावाची पाहणी

स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या मागणीवरून पवई तलाव पाहणी आणि तलाव सुशोभीकरण नियोजन आराखडा बनविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी आज या तलावाची पाहणी केली.
BMC अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी केली पवई तलावाची पाहणी
BMC अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी केली पवई तलावाची पाहणीजयश्री मोरे
Published On

मुंबई : मुंबई उपनगरातील नागरिकांसाठी विरंगुळा ठिकाण असलेल्या पवई तलावाची मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणात स्वच्छता आणि सुशोभीकरण करणार आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या मागणीवरून आज पवई तलाव पाहणी आणि तलाव सुशोभीकरण करण्याचा नियोजन आराखडा बनविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी आज या तलावाची पाहणी केली.

हे देखील पहा -

या ठिकाणी गणेश मुर्ती विसर्जन, दुर्गा माता मुर्ती विसर्जन, छटपूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. पवई तलाव हा एक निसर्गरम्य परिसर असुन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यामुळे तलावाचे सुभोभिकरण करून निसर्गाचा अमूल्य ठेवा जपणे आवश्यक आहे. आता या तलावाशेजारी जॉगिंग ट्रॅक, बगीचा, जेष्ठ नागरीकांना बसण्यासाठी बेंच अशा विविध प्रकारच्या सोयी-सुविधा करण्यात येणार आहेत. तलावातील गाळ, वनस्पती साफसफाई करण्यात येणार आहे. तसेच तलावात सुंदर व संगीताच्या तालावरील भव्य विद्युत रोषणाईयुक्त सात कारंजे बनविण्यात येणार आहेत.

BMC अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी केली पवई तलावाची पाहणी
राज्य सरकारची मदत रिक्षाचालकांपर्यंत पोहचलीच नाही !

यासाठी पालिका तब्बल शंभर कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे. तसेच विहार तलावाचे ओव्हर फ्लो होणारे पाणी भांडुप पंपिंग स्टेशन कडे वळविण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली. तर नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटी प्रमाणे इथे सुशोभीकरण होईल तसेच पर्यावरणच्या नियमांचे काटेकोर पालन करून इथला गाळ काढला जाणार असल्याचे आमदार लांडे यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com