covid news  Saam Tv
महाराष्ट्र

चिंता वाढली! राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय; वाचा आजची आकडेवारी

महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात नव्याने कोरोनाचे संकट येत असल्याचे दिसून येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात नव्याने कोरोनाचे संकट येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे २९४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात एकूण कोरोनाच्या सक्रिय (Corona Positive) रुग्णांची संख्या १६३७० झाली आहे. तर राज्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या १, ४७, ८७० झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात एकूण २९४६ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर दिवसभरात १४३२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात आता पर्यंत एकूण ७७,४६, ३३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९७.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आज जिल्ह्यात तब्बल ७ नव्या कोरोना रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हाची कोरोना (Corona) सक्रिय रुग्ण संख्या ९ झाली आहे. विशेष म्हणजे ४५८ लोकांची चाचणी केल्यावर ७ नवे रुग्ण आढळले आहे. भंडाऱ्यात आतापर्यंत ६७ हजार ९२५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ६६ हजार ७७४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत १ हजार १४२ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्‍यातील काही जिल्‍ह्यात सक्रीय रूग्ण वाढत असल्‍याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कोरोना नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात मकरसंक्रांतीला ₹३००० जमा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला

SCROLL FOR NEXT