Health workers in Solapur and Thane on high alert as COVID deaths reported during early monsoon surge. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

COVID deaths : पावसाळा आला, कोरोनाचा धोका वाढला, सोलापूर अन् ठाण्यात दोघांचा घेतला जीव

Maharashtra Sees 67 New COVID Cases : पावसाळा सुरू होताच महाराष्ट्रात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी ठाणे व सोलापूरमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Two COVID-related deaths reported in Solapur and Thane : पावसाळा सुरू झाल्यानंतर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढळे आहे. राज्यात दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी कोरोना महामारीमुळे राज्यात दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी ठाणे आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ठाण्यामध्ये ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर सोलापूरमधील मृत व्यक्तीचे वय ८१ वर्षे इतके होते. ठाण्यातील महिलेला फ्फुसांशी (COVID cases spike in Maharashtra) संबंधित विविध समस्या होत्या. या दोन्ही रूग्णांचे उपचारादरम्यान निधन झाले.

कोरोना विषाणूमुळे मे २०२५ पासून आतापर्यंत, म्हणजे ४५ दिवसांमध्ये ३१ जणांचा मृत्यू (Maharashtra sees 31 COVID deaths since May 2025) झाला आहे. त्यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक मृताची नोंद आहे. मुंबईमध्ये कोरोनामुळे महिनाभरात ६ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मुंबईमध्ये ४४ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोनामुळे मृत्यू ? COVID-related deaths

कोरोनामुळे मृत झालेल्या सर्व व्यक्तींना गंभीर आजार होते. डॉक्टरांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, कोरोना स्वतःहून मृत्यूचे कारण बनत नाही, परंतु जर एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार असतील तर तो शरीरावर अतिरिक्त दबाव आणून त्याला अधिक कमजोर करू शकतो. अशा प्रकरणांमध्ये मृत्यूचे कारण हे त्या व्यक्तीचा प्राथमिक आजार असते.

सोलापूरमध्ये कोरोना फोफावतोय -

मागील २४ तासांत राज्यात ६७ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सर्वाधिक रूग्ण मुंबई, पुणे आणि सोलापूरमध्ये आढळले आहेत. मुंबईमध्ये १७, पुण्यामध्ये १८ आणि सोलापूरमध्ये १६ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. कोल्हापूरमध्ये चार, छत्रपती संभाजीनगर ३, नागपूर ३, नवी मुंबई २, ठाणे २, पिंपरी चिंचवड १, कल्याण १, रायगड १, पनवेल १ कोरोना रूग्ण आढळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT