Bombay High Court, Nagpur Bench, साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे 'व्यभिचार' नाही, कोर्टाचा पतीला मोठा झटका; पोटगीबाबत महत्त्वाचा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देत लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध हे कायद्यानुसार 'व्यभिचार' ठरत नसल्याचे स्पष्ट केले. पतीचा दावा फेटाळत न्यायालयाने पत्नीला देण्यात आलेली ₹१०,००० मासिक अंतरिम पोटगी कायम ठेवली.

Namdeo Kumbhar

pre-marital relationship not adultery : विवाहपूर्व संबंध आणि वैवाहिक कायद्यांतर्गत येणारा व्यभिचार यांच्यात स्पष्ट फरक स्पष्ट करत, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. पत्नीचे लग्नापूर्वी इतर व्यक्तींशी असलेले शारीरिक संबंध हे 'व्यभिचार' (Adultery) या व्याख्येत मोडत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने केला आहे. या निर्णयामुळे कायद्यातील व्यभिचाराची व्याख्या आता अधिक स्पष्ट झाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

न्यायालयात दाखल असलेल्या एका प्रकरणात, पतीने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. पत्नीचे लग्नापूर्वी अनेक पुरुषांसोबत अनैतिक संबंध होते, त्यामुळे ती व्यभिचारी आहे आणि अशा पत्नीला पोटगी (Maintenance) मिळण्याचा कोणताही अधिकार नाही, असा दावा पतीने केला होता. पतीच्या या दाव्याच्या आधारे पत्नीची पोटगी बंद करण्यात यावी, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली होती.

न्यायमूर्ती एम. एम. नेरलीकर यांचा महत्त्वाचा निर्णय

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. नेरलीकर यांनी नागपूरस्थित एका व्यक्तीने दाखल केलेला अर्ज पूर्णपणे फेटाळून लावला. संबंधित व्यक्तीने कौटुंबिक न्यायालयाच्या (Family Court) २० एप्रिलच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला तिच्या अर्जाच्या तारखेपासून ते त्यांच्या वैवाहिक वादाचा अंतिम निकाल लागेपर्यंत अंतरिम पोटगी मंजूर केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या या आदेशात कोणताही हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला.

व्यभिचाराच्या आरोपावर, न्यायाधीशांनी नमूद केले की दोन्ही पक्षांनी एकमेकांवर अनेक आरोप आणि प्रत्यारोप केले होते. “केवळ आरोप करणे पुरेसे नाही, जोपर्यंत ते पुराव्याने सिद्ध होत नाहीत. त्याला अंतिम सत्य मानले जाऊ शकत नाही,” असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

न्यायालयाने पतीचा दावा फेटाळत पोटगी ठेवली कायम

नागपूर खंडपीठाने पतीचा युक्तिवाद फेटाळून लावला असून पत्नीचे विवाहपूर्व संबंध हे लग्नाआधीचे असल्याने त्याला व्यभिचार म्हटले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. यासोबतच, पत्नीला दिली जाणारी १० हजार रुपयांची मासिक अंतरिम पोटगी कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

न्यायालयाने स्पष्ट केली 'व्यभिचाराची' कायदेशीर व्याख्या

हा निकाल देताना खंडपीठाने कायद्यानुसार व्यभिचार म्हणजे काय, हे सोप्या शब्दांत नमूद केले. न्यायालयाने स्पष्ट केले की, "कायद्यानुसार व्यभिचार म्हणजे एखाद्या विवाहित व्यक्तीने आपल्या कायदेशीर जीवनसाथीव्यतिरिक्त (पती किंवा पत्नीव्यतिरिक्त) इतर कोणत्याही व्यक्तीसोबत स्वतःच्या इच्छेने ठेवलेले लैंगिक संबंध होय." हा नियम लग्नानंतरच्या संबंधांना लागू होतो, त्यामुळे लग्नापूर्वीच्या संबंधांना यात जोडता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: 24 वा हप्ता आला नाही? शेतकऱ्यांनो, या नंबरवर करा फोन; लगेच कळेल पैसे अडकल्याचे कारण

Pune : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! १ नोव्हेंबरपासून अर्ध्या तिकिटात करता येणार PMP बस प्रवास

Pradeep Jadhav Case: प्रदीप जाधव आत्महत्या प्रकरण, जे.पी गर्ग यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; तपासातून धक्कादायक माहिती उघड

Ice Facial Benefits : बर्फाचा तुकडा तुमचं आयुष्य उजळून टाकेल! त्वचेच्या आरोग्याला होतील 'हे' ७ सॉलिड फायदे

Maharashtra News Live Update: अखेर मनसेची शिवाजी पार्क येथील रोषणाई रद्द

SCROLL FOR NEXT